क्रीडांगणाच्या जागेला मुदतवाढ देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:02 AM2017-08-01T04:02:47+5:302017-08-01T04:02:47+5:30

येथील गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टला क्रीडांगणासाठी १ हेक्टर गायरान जमीन १ रुपये भाडेपट्ट्यावर १५ वर्षांसाठी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या जागेची मुदत संपत असल्याने

Do not extend the playground area | क्रीडांगणाच्या जागेला मुदतवाढ देऊ नये

क्रीडांगणाच्या जागेला मुदतवाढ देऊ नये

Next

वाघोली : येथील गेनबा सोपानराव मोझे ट्रस्टला क्रीडांगणासाठी १ हेक्टर गायरान जमीन १ रुपये भाडेपट्ट्यावर १५ वर्षांसाठी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या जागेची मुदत संपत असल्याने जिल्हाधिका-यांनी क्रीडांगणाला मुदतवाढ न देता शासनाकडे जमा करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर सातव यांनी केली आहे. त्याचबरोबर वाघोली ग्रामसभेने देखील मुदत वाढवून न देण्याचा ठराव जिल्हाधिकाºयांना पाठविला आहे.
वाघोली बाएफ रस्त्यालगत असणाºया गट क्रमांक २१८१ मधील ३ हेक्टर ९९ आर गायरान जागा महाविद्यालयाच्या इमारतीसाठी व डिसेंबर २००३ मध्ये १ हेक्टर गायरान जागा क्रीडांगणासाठी १५ वर्षांच्या कालावधीसाठी अटी व शर्थीवर गेनबा सोपान मोझे ट्रस्टला देण्यात आली होती.
क्रीडांगणासाठी देण्यात आलेल्या जागेची मुदत संपत असल्याने सदरची जागेची मुदतवाढ न देता शासनाकडे जमा करावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
त्याचबरोबर वाघोली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ही जागा वाघोली गावाकरिता १ रु. भाडेपट्ट्याने ग्रामनिधी व लोकवर्गणीतून क्रीडांगण उभारण्यासाठी द्यावे, असा ठराव करण्यात आला आहे.

Web Title: Do not extend the playground area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.