आमिषाला बळी पडू नका
By admin | Published: May 24, 2017 04:05 AM2017-05-24T04:05:06+5:302017-05-24T04:05:06+5:30
इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन आणि गुणवत्तेनुसार होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन आणि गुणवत्तेनुसार होणार आहेत. त्यामुळे प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रवेशप्रक्रियेबाहेरील कोणत्याही घटकाने आमिष दाखविल्यास त्याला बळी पडू नका. तसेच, काही खासगी कोचिंग क्लासेसकडूनही प्रवेश अर्ज भरण्याबाबत दिशाभूल केली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कशालाही बळी न पडता शाळेत प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने केले आहे.
काही वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या प्रक्रियेत भाग १ व भाग २ असे दोन अर्ज भरावे लागणार आहेत. भाग १ भरण्याची प्रक्रिया येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेसह सायबर कॅफे, कोचिंग क्लासेस किंवा घरबसल्याही आॅनलाईन अर्ज भरता येत होते; मात्र यंदा केवळ शाळांमध्येच अर्ज भरून घेतले जाणार आहेत. आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना या प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. प्रवेशप्रक्रियेच्या काही जण इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. काही कोचिंग क्लासेसकडूनही काही ठराविक महाविद्यालयांचे पसंतीक्रम देण्याबाबत आग्रह धरला जातो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यांना घराजवळच्या किंवा आपल्या गुणवत्तेनुसार चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आॅनलाईन प्रक्रियेमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अर्ज भरावेत, असे आवाहन समितीने केले आहे.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेश समितीने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ झोनअंतर्गत विविध ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहे. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र केंद्रे दिली.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी झोननिहाय मार्गदर्शन केंद्र
झोन १ - पुणे शहर विभाग
झोन केंद्र - स. प. महाविद्यालय
मार्गदर्शन केंद्र - १. नू. म. वि. मुलांचे विद्यालय, अप्पा बळवंत चौक
२. स. प. महाविद्यालय
३. शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ
४. एस. व्ही. युनियन कनिष्ठ महाविद्यालय
झोन २ - कर्वेनगर/कोथरूड विभाग
झोन केंद्र - आबासाहेब गरवारे महाविद्यालय
मार्गदर्शन केंद्र - १. एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, कर्वे रस्ता
२. आबासाहेब गरवारे महाविद्यालय
झोन ३ - पर्वती/धनकवडी/स्वारगेट विभाग
झोन केंद्र - मुक्तांगण हायस्कूल, सहकारनगर
मार्गदर्शन केंद्र - १. श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती
२. कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, धनकवडी
३. मोलेदिना हायस्कूल
झोन ४- सिंहगड रस्ता विभाग
झोन केंद्र - वसंतराव सखाराम सणस विद्यालय, वडगाव
मार्गदर्शन केंद्र - १. वसंतराव सखाराम सणस विद्यालय
२. रावसाहेब पटवर्धन विद्यालयझोन ५- कॅम्प/येरवडा विभाग
झोन केंद्र - नौरोसजी वाडिया कॉलेज
मार्गदर्शन केंद्र - १. पूना कॉलेज, गोळीबार मैदान
२. नौरोसजी वाडिया महाविद्यालय
३. नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, येरवडा
झोन ६ हडपसर विभाग
झोन केंद्र - आकुताई कल्याणी साधना विद्यालय, हडपसर
मार्गदर्शन केंद्र - १. साधना विद्यालय
२. अण्णासाहेब मगर महाविद्यालय
झोन ७ - शिवाजीनगर/औंध/पाषण विभाग
झोन केंद्र - मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
मार्गदर्शन केंद्र - १. फर्ग्युसन महाविद्यालय
२. मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर
३. बी. आर. घोलप विद्यालय, सांगवी
४. आलेगावकर हायस्कूल, खडकी
झोन ८ - पिंपरी भोसरी विभाग
झोन केंद्र - जयहिंद महाविद्यालय, पिंपरी
मार्गदर्शन केंद्र - १. नवमहाराष्ट्र विद्यालय,
पिंपरी गाव
२. श्री भैरवनाथ विद्यालय, भोसरी
३. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी
विशेष आरक्षण कोणासाठी?
१.कला व सांस्कृतिक
२. चित्रकला
३. क्रीडा
४. बदलीने आलेल्या राज्य शासन, केंद्र शासन किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पाल्य
५. आजी-माजी सैनिकांचे पाल्य
६. स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य
७. दिव्यांग
८. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त