घरी जाऊन करा गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद
By admin | Published: October 14, 2016 05:24 AM2016-10-14T05:24:42+5:302016-10-14T05:24:42+5:30
शालेय पोषण आहार, शालेय बांधकाम, आधार काडार्चे काम, आॅनलाईन माहिती आणि सरलचे रकाने भरुन देणे अशा अनेक अशैक्षणिक
नितीन ससाणे / जुन्नर
जुन्नर : शालेय पोषण आहार, शालेय बांधकाम, आधार काडार्चे काम, आॅनलाईन माहिती आणि सरलचे रकाने भरुन देणे अशा अनेक अशैक्षणिक कामांखाली दबलेल्या शिक्षकांना आता गैरहजर विद्यार्थ्यांचा पंचनामा त्यांच्या घरी जाऊन करावा लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने हे नवे फर्मान काढले आहे. या पंचनाम्यासाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याचे नाव लिहून त्याच्या राहण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी शिक्षकाने जायचे आहे. त्याने भेट दिल्याची तारीख वेळ नोंद करुन संबंधित विद्यार्थी शाळेत का येत नाही. तो पालकांसह तेथून दुसरीकडे गेला असेल तर स्थलांतरीत झाल्याची नोंद करायची आहे. तर कोठे गेला माहीती नसेल तर कोठे राहतो माहीत नाही. विद्यार्थी आजारी असल्याने येत नसेल तर तशी नोंद करावी. तर विद्यार्थ्याला पालक पाठविण्यास तयार नाहीत अशी स्थिती असेल तर तशी नोंद करावी.
त्यासाठी दोन साक्षीदार सोबत असावेत. त्या साक्षीदारांनी ही माहीती दिली. म्हणून त्या साक्षीदारांची नावे देखील त्या पंचनाम्यात घ्यायची आहेत. साक्षीदारांसह पंचनामा करणाऱ्या शिक्षकाची आणि मुख्याध्यापकाची सही देखील करणे बंधनकारक आहे.