अन्याय होऊ देणार नाही : पालकमंत्री

By Admin | Published: August 10, 2016 12:59 AM2016-08-10T00:59:54+5:302016-08-10T00:59:54+5:30

मावळच्या जनतेवर आन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळ पवनानगर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त केले.

Do not let injustice happen: Guardian Minister | अन्याय होऊ देणार नाही : पालकमंत्री

अन्याय होऊ देणार नाही : पालकमंत्री

googlenewsNext

पवनानगर : मावळच्या जनतेवर आन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळ पवनानगर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त केले.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीने पाणी नेण्याला विरोध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर ९ आॅगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी मरण पावले. या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी पवनानगर येथे शोकसभेचे आयोजन केले होते. या वेळी बापट बोलत होते. तत्कालीन सरकारने बंद जलवाहिनीबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. यासह आंदोलनही चुकीच्या मार्गाने हाताळले.
यामुळे शेतकऱ्यांचे बलिदान गेले. पण, आता आपण शासनाचा प्रतिनीधी असून, मावळचेच पुत्र आहोत. यामुळे मावळच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. पाण्यावर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. हा प्रश्न मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा असल्याची मला जाणीव आहे. हा प्रश्न सोडवताना शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मनाप्रमाणेच प्रश्न सोडवू. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तर शहीद शेतकऱ्यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमासाठी गिरीष बापट, आमदार संजय भेगडे, केशव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, प्रशांत ढोरे, मच्छिंद्र खराडे, एकनाथ टिळे, भारत ठाकूर, सविता गावडे, दीपाली म्हाळस्कर, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, जितेंद्र बोत्रे, सचिन शेळके आदी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित नागरिकांनी गोळीबार प्रकरणातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. पवना जलवाहिनी रद्द करण्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.(वार्ताहर)


श्रद्धांजली सभेनंतर शेतकरी नाराजच
पवनानगर : पवना बंद जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेल्या मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर, श्यामराव तुपे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आले. मात्र, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करण्याबाबत कसलीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध दर्शविण्यासाठी केलेल्या आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, भाजपा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, अशी आश्वासने सत्तेत येण्यापूर्वी मावळ तालुक्यातील प्रचारावेळी भाजपाने दिली.
मात्र, भाजपा व शिवसेना युतीचे सरकार येऊन दोन वर्षे झाली, पण या आंदोलनातील १९८ शेतककऱ्यांवरील गुन्हे अद्यापही मागे घेतले नाही. यामुळे मंगळवारच्या शोकसभेत पालकमंत्री पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा करावी व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन द्यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत पालकमंत्री काहीही स्पष्ट न केल्याने सभा संपल्यानंतर नाराजीची चर्चा होती.
वडगावमधील बाळासाहेब शिंदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन गेली ४ वर्षे वडगाव ते पवनानगर हा परतीचा प्रवास ते करत आहेत. या वर्षीदेखील ते चालत या शोकसभेसाठी आले होते.

Web Title: Do not let injustice happen: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.