ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पालखीचित्रण नको!

By admin | Published: July 9, 2015 02:24 AM2015-07-09T02:24:45+5:302015-07-09T04:42:50+5:30

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हवाई चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्याचा देवस्थानने घेतलेला निर्णय आता रद्द करावा लागणार आहे.

Do not paint a drone camera! | ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पालखीचित्रण नको!

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पालखीचित्रण नको!

Next

आळंदी : ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हवाई चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्याचा देवस्थानने घेतलेला निर्णय आता रद्द करावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुणे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जारी केलेल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, महत्त्वाची धरणे, अनेक केंद्रीय संस्था आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रीकरणाचा दहशतवादी कारवायासाठी उपयोग केला जाण्याची शक्यता आहे.
दोन-तीन महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील पौड, मावळ, मुळशी तसेच इतर परिसरात झालेल्या लग्नसमारंभात एका मॅनेजमेंट कंपनीकडून छायाचित्रणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर झाल्याची गोपनीय माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. कंपनीने कोणतीच परवानगी घेतली नसल्याचेही उघड झाले आहे.

> ड्रोन कॅमेऱ्याद्वारे महत्त्वाची धार्मिक स्थळे, संस्था, धरणे, सोहळा व सभा व इतर महत्त्वाची ठिकाणी याचे छायाचित्रीकरण होऊन त्याचा दुरुपयोग होवू शकतो.देहू व आळंदी येथील पालखी सोहळा असून, त्यात छायाचित्रणाकरिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

> त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करणाऱ्या संस्थांनी याबाबतची पूर्वमाहिती देणे आवश्यक आहे. अशा संस्थांनी सात दिवसांपूर्वी संबंधित पोलीस ठाण्याकडून रीतसर परवानगी घ्यावी.
> यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुरेश जाधव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ नुसार ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रीकरणास प्रतिबंध केला आहे.

Web Title: Do not paint a drone camera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.