कपात करणार नाही, सांगत आठवड्याला पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:29 AM2019-01-22T02:29:58+5:302019-01-22T02:30:04+5:30
पुणेकरांच्या हक्काचे एक थेंबही पाणीकपात करू देणार नाही, असे सत्ताधारी भाजपाकडून वारंवार सांगितले जात असताना महापालिका प्रशासनाकडून दर आठवड्याला पाणीपुरवठा बंद ठेवून पुणेकरांची खरोखर चेष्टा सुरू आहे.
पुणे : पुणेकरांच्या हक्काचे एक थेंबही पाणीकपात करू देणार नाही, असे सत्ताधारी भाजपाकडून वारंवार सांगितले जात असताना महापालिका प्रशासनाकडून दर आठवड्याला पाणीपुरवठा बंद ठेवून पुणेकरांची खरोखर चेष्टा सुरू आहे. गेल्या २१ दिवसांत सहा दिवस शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. प्रशासनाकडून दर आठवड्याला शहराली सर्व जलकेंद्रांवर एकाच वेळी पंपिंग, विद्युती व दुरुस्तीच्या कामांसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पाटबंधारे विभागाकडून वारंवार करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून पुणेकरांचे हक्काचे एक थेंब ही पाणीकपात करू देणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने पंपिंग स्टेशनच्या देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. गेल्या तीन आठवड्यांत तर प्रत्येक आठवड्याला गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गुरुवारी एक दिवस
पाणीपुरवठा बंद असला तरी शुक्रवारी कमी दाबाने म्हणजे अनेक भागात पाणीपुरवठाच होत नाही.
यामुळे गेल्या २१ दिवसांत पुणेकरांना ६ दिवस पाणीकपातीला सामारे जावे लागले आहे. यामुळे शहरामध्ये अघोषित पाणीकपात सुरू असल्याची भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
>कमी दाबाने पाणी
शहराला पाणी पुरवठा करणाºया पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
यामुळे येत्या गुरुवारी (दि. २४) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २५) देखील संपूर्ण शहरात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
>गुरुवारी या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.
>पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर.
>लष्कर जलकेंद्र
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी.
>वडगाव जलकेंद्र
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक. चतु:शृंगी, एसएनडीटी.