स्वाभिमानाला विकू नका, मतदानाला चुकू नका !
By श्रीकिशन काळे | Published: November 19, 2024 11:57 AM2024-11-19T11:57:24+5:302024-11-19T11:58:00+5:30
कर्णबधीर विध्यार्थ्याकडून हडपसरमध्ये मतदान जनजागृती फेरी
पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. हडपसर येथील सुह्रद मंडळ संचालित हडपसर कर्णबधिर विद्यालयाच्यावतीने मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.
'चला मतदान करुया, देशाची प्रगती घडवू या, स्वाभिमानाला विकू नका, मतदानाला चुकू नका, नका चूकु नका विकू, मतदारांऩो नका झुकू, मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा' यांसारख्या घोषणांचे फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते. विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका तसेच विध्यार्थ्यांनी पालकांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करुन मतदान करावे असे आवाहन केले. विशेष शिक्षकांनी कर्णबधिर विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मुक सांकेतिक लिपी द्वारे पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी मतदान जनजागृती फेरी काढली. या जनजागृती फेरीमध्ये परिसरातील नागरिक, फेरीवाले, रिक्षावाले तसेच व्यापारी व दुकानदार यांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणेसाठी आवाहन करण्यात आले.
या वेळी कर्णबधिर प्रवर्गातील दिव्यांग मतदारांना हेल्पलाइन विषयी माहिती देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री तोरणे, उपमुख्याध्यापाक विवेक बनगर, विशेष शिक्षक मोनाली जगताप, सचिन म्हस्के, सचिन इंगळे, राहुल शिंदे, संगीता उकिरडे, उद्धव दिघोळे, हिंमत बंड, परमेश्वर घोडके, सुनीता भालेराव तसेच अशोक धांदे, मनोहर बदडे, योगेश कुचेकर जनजागृती फेरीत सहभागी झाले होते.