शाळा सुरू करण्यास मज्जाव
By admin | Published: June 1, 2016 12:51 AM2016-06-01T00:51:16+5:302016-06-01T00:51:16+5:30
पांढरस्थळवस्तीमधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळेच्या पटांगणावर व परिसरात होणारे अतिक्रमण थांबविण्यास प्रशासन प्रयत्न करीत नाही
उरुळी कांचन : येथील पांढरस्थळवस्तीमधील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळेच्या पटांगणावर व परिसरात होणारे अतिक्रमण थांबविण्यास प्रशासन प्रयत्न करीत नाही. प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईला या शाळेला बक्षीसपत्राने दिलेल्या जागेचा वाद मिटविण्यात पंचायत समिती कार्यालयाकडून
करण्यात येणाऱ्या वेळकाढूपणाला कंटाळून, येथील नागरिकांनी
माजी ग्रामपंचायत सदस्य
बाळासाहेब ऊर्फ मारुती ज्ञानोबा कांचन यांच्या नेतृत्वाखाली ही
शाळा चालू शैक्षणिक वर्षात
सुरू होऊ देण्यास मज्जाव
करण्याचा निर्णय घेतला आहे,
अशी माहिती लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की परिसरातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जिल्हा
परिषदेच्या शाळेसाठी उरुळी कांचन येथील पांढरस्थळ वस्तीमधील
(गट नं. ६९८, ६७८, ६८६ पैकी) काही जमीन बक्षीसपत्राद्वारे देण्यात आली आहे.
परंतु ज्याने अतिक्रमण केले आहे, त्याच्या राजकीय व आर्थिक दडपशाहीला बळी पडून त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष करीत सर्वसामान्य नागरिकांच्या विशेष करून मागासवर्गीय पालकांच्या
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून व त्याठिकाणी नियमाप्रमाणे
मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे.
या वर्षी जूनमध्ये सुरू होणारी शाळा आम्ही बक्षीसपत्राने भूमिदान करणाऱ्या मंडळीचे वारसदार या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई होत नसल्याने शाळा चालू होऊ देण्यास मज्जाव करणार आहोत.
यासाठी प्रसंगी प्राणांतिक उपोषण करून तीव्र लढा देणार असल्याचा इशारा त्यांनी आपल्या निवेदनात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, तहसीलदार हवेली, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक), गटविकास अधिकारी हवेली यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी यांना दिला आहे,
तसेच अतिक्रमण त्वरित हटवून ते करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बाळासाहेब कांचन व इतरांनी केली आहे.
(वार्ताहर)