पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका
By admin | Published: April 25, 2016 02:45 AM2016-04-25T02:45:49+5:302016-04-25T02:45:49+5:30
मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या
पुणे : मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करून ते त्यांच्या जखमेवर मीठ का चोळत आहोत अशी विचारणा सजग नागरिक मंचच्यावतीने पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे.
कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यापार्श्वभुमीवर सजग नागरिक मंचने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांना त्यांनी याबाबात ११ प्रश्न विचारले आहेत.
आॅक्टोबर - जून या काळातील दौंड व इंदापूरची पिण्याच्या पाण्याची गरज प्रत्येकी ०. ३ टीएमसी असल्याचे पाटबंधारे खात्याचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना त्याच्या ४ पट पाणी गेल्या ६ महिन्यात त्यांच्या साठी सोडले गेले त्याचे काय झाले ?, कालव्यातून इंदापूरला पाणी पोचेपर्यंत १. ५० टीएमसी तर दौंड ला पाणी पोहोचे पर्यत १. ० टीएमसी पाण्याची गळती होते, हे आपणास माहित आहे का ? त्यांना आता १ टीएमसी पाणी हवे असेल तर कालव्यातून २.५० टीएमसी पाणी सोडावे लागेल. एवढे पाणी धरणात आहे का? इंदापूर भोगोलिकदृष्टया उजनीच्या जवळ असताना त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज उजनीच्या अचल साठ्यातून भागवता येणार नाही का? दौंडला पाणी पोचेपर्यंत पाणी गळती लक्षात घेता दौंडला रेल्वे ने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आपण विचार केला का ?