दाभोलकर हत्येचा तपास थांबवू नका

By admin | Published: December 20, 2014 11:46 PM2014-12-20T23:46:30+5:302014-12-20T23:46:30+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाऊन सहा महिने उलटल्यानंतरही अद्यापही तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही.

Do not stop the murder of Dabholkar murder | दाभोलकर हत्येचा तपास थांबवू नका

दाभोलकर हत्येचा तपास थांबवू नका

Next

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाऊन सहा महिने उलटल्यानंतरही अद्यापही तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही. ज्याप्रमाणे माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास बंद करण्यात आला तशा पद्धतीने दाभोलकरांच्या हत्येचा तपास बंद करण्यात येऊ नये, अशी विनंती दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी सरकारकडे केली आहे.
ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी वी. रा. शिंदे पुलावर दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेला शनिवारी सोळा महिने पूर्ण झाले. सुरुवातीला पोलीस आणि आता सीबीआयकडून तपासात होत असलेल्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी अंनिस आणि समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

दाभोलकरांच्या हत्येच्या तपासात होणारी दिरंगाई पोलिसांची उदासीनता दाखवीत आहे. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Web Title: Do not stop the murder of Dabholkar murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.