पूर्वभागात गुरुवारी पाणी नाही
By admin | Published: June 28, 2017 04:19 AM2017-06-28T04:19:33+5:302017-06-28T04:19:33+5:30
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जलकेंद्र बंद राहणार असल्याने पुण्याच्या पूर्वभागाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गुरुवारी (दि. २९) बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जलकेंद्र बंद राहणार असल्याने पुण्याच्या पूर्वभागाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गुरुवारी (दि. २९) बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. ३०) पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
बंद राहणार असलेला भाग याप्रमाणे. पर्वती जलकेंद्र- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मवती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी, एरंडवणा, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, मिठानगर, शिवनेरी, भाग्योदय, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द.
वडगाव जलकेंद्र- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.
चतु:शृंगी जलकेंद्र - पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भुगाव.
लष्कर जलकेंद्र- लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, वडगाव रोड, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.
नवीन होळकर पंपिंग स्टेशन- विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर.