स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वा-यावर?, आवश्यक सोयीसुविधा नाही; तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 05:02 AM2017-09-25T05:02:10+5:302017-09-25T05:02:19+5:30
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना वाचनालय, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही.
पुणे : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना वाचनालय, ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तसेच शासनाकडून मिळणा-या मानधनात पुण्यात राहणे शक्य होत नाही, असे काही विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने वाºयावर सोडले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे. योग्य प्रशिक्षणाअभावी भारतीय प्रशासकीय सेवेत तसेच राज्य सेवेसाठी घेण्यात येणाºया स्पर्धा परीक्षांमध्ये ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे राज्याच्या आदिवासी विकास विभागातर्फे या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वत: पूर्ण न करता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेकडे दिली आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळत आहे. मात्र, परंतु, विद्यार्थ्यांना इतर सोयी-सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी विविध समस्या मांडण्यासाठी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच वाचनालयाची व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील इमारतीत काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. मात्र, संस्थेने इमारतीमधील वाचनालय बंद केले. परिणामी अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी जावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे. त्यामुळे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुसज्ज ग्रंथालय उभे करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
बार्टीकडून चांगले मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आता स्वायत्त झाली आहे. त्यामुळे बार्टीप्रमाणे या संस्थेनेही आम्हाला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.