Video: वाईनच्या दुकानात किराणा मिळतो का? पुणेकरांचा सवाल, वाईनविक्रीला कडाडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:24 PM2022-01-30T16:24:59+5:302022-01-30T16:25:12+5:30

वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला

Do you get wine at the grocery store Pune cirizens question strongly opposes maharashtra government decision wine sales | Video: वाईनच्या दुकानात किराणा मिळतो का? पुणेकरांचा सवाल, वाईनविक्रीला कडाडून विरोध

Video: वाईनच्या दुकानात किराणा मिळतो का? पुणेकरांचा सवाल, वाईनविक्रीला कडाडून विरोध

Next

पुणे: वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होऊ लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकमतने पुण्यातील सुपर मार्केट आणि दुकानदारांशी संवाद साधला. त्यावेळी पुणेकरांचा किराणा मालाच्या दुकानात वाईन विक्रीला कडाडून विरोध असल्याचे दिसून आले.

''दुकानात वाईन विक्री करणे हा अत्यंत चुकीचं निर्णय असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तर आम्ही दुकानात फॅमिली आणि लहान मुलांसहित येत असतो. त्यामुळे अशा ठिकाणी वाईन विक्री योग्य वाटणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.''  
  
मुलांच्या प्रश्नाला कशी देणार उत्तरे 

सुपर मार्केटमध्ये इतर पदार्थांसोबत अल्कोहोलिक ड्रिंकची गरज वाटत नाही. आमच्यासोबत लहान मुले असतात. ते सगळ्या पदार्थांची चौकशी करतात. अनेक वस्तू घेण्याचा हट्टही धरतात. त्यांना दुकानात अशी काही नवीन वस्तू दिसली कि उत्सुकतेपोटी अनेक प्रश्न आम्हाला विचारले जातात. तेव्हा आम्ही त्यांना काय उत्तर देणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.  

अल्कोहोल घेणाऱ्या लोकांची मानसिकता फारच वेगळी

वाईन विक्रीचा हा निर्णय योग्य नाही. फॅमिली आणि लहान मुले बरोबर असतात. ज्यांना वाईन घ्यायची आहे ते वाईन शॉपमध्ये जाऊ शकतात. अल्कोहोल घेणाऱ्या लोकांची मानसिकता फारच वेगळी असते. ते अशा सुपर मार्केटमध्ये येऊन किरीकर, भांडण करणार. हे बरोबर वाटणार नाही असाही ते म्हणाले आहेत.    

मुलं आमच्या नकळत आली तर काय करणार 

या निर्णयाला माझा कडक विरोध आहे. वाईन ही वाईनच्या दुकानात विका. पोर अशा गोष्टींकडे लगेच आकर्षित होतात. एकत्र असताना मुलांना नकार देता येईल. पण आमच्या नकळत ते आले तर काय करणार. वाईनच्या दुकानात किराणा मिळतो का? असा सवालही पुणेकरांनी उपस्थित केला आहे.  

या निर्णयाने आपल्या संस्कृतीला धक्का बसतोय 

सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा आहे. जीवनावश्यक वस्तूंसोबत वाईन विकणे आम्हाला तरी चुकीचे वाटते. थोडक्यात आपण पाश्चात्य संस्कृती इकडं आणतोय. त्यामुळे आपल्या संस्कृतीला धक्का बसतोय. असंही काही नागरिक म्हणाले आहेत. 

 तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्यसाठी सरकारने उचलले हे पाऊल 

दुकानात आम्ही धार्मिक संस्कारांच्या गोष्टी विकतो. गणेशोत्सव काळात गणपतीच्या मुर्त्याही विक्रीसाठी ठेवल्या जातात. दुकानात वाईन विक्री हे आपल्या संस्कृतीला पटत नाही. तरुण पिढीला हा निर्णय योग्य वाटलाही असेल. पण तरुण पिढीला व्यसनाधीन बनवण्याचे पाऊल सरकराने आता उचलले आहे असे यावली दुकानदाराने सांगितले.    

Web Title: Do you get wine at the grocery store Pune cirizens question strongly opposes maharashtra government decision wine sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.