तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 02:18 PM2022-11-13T14:18:27+5:302022-11-13T14:40:36+5:30

ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा एक ग्राहक म्हणून माहिती असायलाच पाहिजेत

Do you take advantage of these free facilities at the petrol pump | तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का?

तुम्ही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या 'या' मोफत सुविधांचा लाभ घेता का?

googlenewsNext

संतोष गाजरे

कात्रज : देशात सरकारी तसेच खासगी पेट्रोल पंपाचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. रोजच पेट्रोल पंपावर जाणाऱ्या बऱ्याच नागरिकांना आपल्याला मोफत मिळत असणाऱ्या सुविधाची माहिती नसल्याचे समोर येत आहे. अनेक वेळा आपण जाहिरातीमध्ये पाहत असतो जागो ग्राहक जागो परंतु आपण अनेक वेळा आपलीच होत असणारी फसवणुकीकडे डोळेझाक करत असतो. अनेक वेळा आपण पेट्रोल पंपावर जातो रांगेमध्ये थांबून पेट्रोल भरतो व पैसे देऊन चालते होतो. पण पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरणाऱ्या ग्राहकांना काही हक्क व अधिकार आहेत. त्या बरोबर ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकावर बंधनकारक असून त्या सेवा एक ग्राहक म्हणून माहिती असायलाच पाहिजेत.

पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या मोफत सुविधा.

शौचालय-

प्रवासासाठी बाहेर पडल्यावर आपल्या समोर शौचालयाला रस्त्यावर कोठे जाणार हा नेहमी प्रश्न असतो अशावेळी स्वच्छ शौचालय शोधणे खूपच अवघड असते. परंतु अशा वेळी आपण कोणत्याही पेट्रोल पंपावर यासाठी जाऊ शकता व शौचालयाचा मोफत वापर करू शकता.

पिण्याचे स्वच्छ पाणी-

पेट्रोल पंपावर गेल्यावर महत्त्वाची असणारी सुविधा म्हणजे पिण्याचे स्वच्छ पाणी. जर आपण लांबच्या प्रवासाला जात असू आणि अचानक जर तहान लागली असेल तर कोणत्याही पेट्रोल पंपावर थांबून आपण पाणी पिऊ शकतो. तसेच पाणीदेखील भरून घेऊ शकतो.

वाहनात मोफत हवा भरणे-

पेट्रोल पंपावर गेल्यावर जर वाहनामध्ये हवा भरायची असेल तर वाहनचालक तिथे मोफत हवा भरू शकतात; पण बऱ्याच वेळा असे दिसून येते की वाहनचालक यासाठी पैसे मोजतात. कोणत्याही पेट्रोल पंपावर तुम्हाला टायरमध्ये हवा भरण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही, ही सेवा एकदम मोफत असते.

इंधनाच्या गुणवत्तेची चाचणी

जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेल्यानंतर एखाद्याला इंधनाच्या गुणवत्तेवर संशय येत असेल तर तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेलच्या टेस्टसाठी आग्रह धरू शकता. इंधनावरून आपल्याला काही संशय असेल तर याची चाचणी देखील करू शकता.

प्राथमिक उपचार किट

महामार्गवर जर दुर्घटना झालीच तर तुम्ही प्राथमिक उपचारासाठी व्यक्तीला मदत करण्यासंबंधी जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन त्यांच्याकडून प्राथमिक उपचार किट विचारू शकता. अशा वेळी पेट्रोल पंप चालकांना त्यांच्याकडे पूर्ण प्राथमिक उपचार किट ठेवणे गरजेचे आहे.

आपातकालिन फोन कॉल

एखाद्या वेळेस रस्त्यावर अपघात झाला तसेच दुर्घटना झाली तर पेट्रोल पंपावर जाऊन कोणा नातेवाइकांना फोन करायचा असेल किंवा मदत करण्यासाठी फोन करायचा असेल तर अशावेळी आपण पेट्रोल पंपावर जाऊन मोफत कॉल करू शकतो.

बिल

वाहनात पेट्रोल भरल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला पेट्रोलचे बिल घेण्याचा अधिकार असतो. जर एखाद्याला त्याची फसणूक झाली आहे असे वाटत असेल तर तो व्यक्ती मिळालेल्या बिलाच्या आधारे त्याची तक्रार नोंदवू शकतो.

किंमत

पेट्रोल पंपावर गेल्यावर नंतर आपल्याला समोरच मोठ्या ठळक अक्षरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर लावल्याचे पाहायला मिळते. परंतु अनेकांना हे माहीतच नाही.प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल भरण्याआधी त्याची किंमत जाणून घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेलची किंमत मोठ्या अक्षरात लिहिलेली असते.

''प्रत्येक पेट्रोल पंपावर नागरिकांना काही सुविधा दिल्या जातात जर सुविधा नसतील तर त्या संदर्भात नागरिक तक्रार देखील करू शकतात तसेच पावती न मिळणे किंवा पेमेंट डेबिट होऊनही न पोहचणे अशा तक्रारी जास्त असतात त्याचे आम्ही निरसन करत असतो. - सूरज आर, क्षेत्र व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम.''

Web Title: Do you take advantage of these free facilities at the petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.