Pune: क्लिनिकमध्ये तपासणी गेलेल्या तरुणीसोबत डॉक्टरने केले अश्लील चाळे
By नितीश गोवंडे | Updated: December 1, 2023 16:09 IST2023-12-01T16:08:46+5:302023-12-01T16:09:19+5:30
विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

Pune: क्लिनिकमध्ये तपासणी गेलेल्या तरुणीसोबत डॉक्टरने केले अश्लील चाळे
पुणे : मायग्रेनचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या तरुणीसोबत डॉक्टरने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून न्युरोलॉजिस्ट डॉक्टरवर स्वारगेट पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २९ नोव्हेंबर रोजी मुकूंदनगर येथे सायंकाळी सव्वासहा ते साडेसहाच्या सुमारास घडला. डॉ. श्रीपाद पुजारी (न्युरोलॉजीस्ट, बिझनेस कोर्ट, ६ वा मजला, मुकुंदनगर, स्वारगेट) असे आरोपी डॉक्टरचे नाव असून, याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या तरुणीने गुरुवारी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीपाद पुजारी हा न्युरोलॉजीस्ट असून त्याचे मुकुंदनगर येथील बिझनेस कोर्ट येथे क्लिनिक आहे. पीडित तरुणीला मायग्रेनचा त्रास होत असल्याने त्या डॉ. पुजारी याच्या क्लिनिकमध्ये बुधवारी संध्याकाळी तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पुजारी याच्या केबिनमध्ये कोणतीही महिला अटेंडंट नव्हती. त्यावेळी आरोपी डॉक्टरने फिर्यादी यांच्याकडे पाहून, ‘तु एकटीच आली आहे का? तु किती सुंदर व शांत आहेस, माझी राणी’ असे बोलून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कीर्ती चाटे या करत आहेत.