प्रॅक्टिसमधील गैरप्रकार डॉक्टरांनी थांबवावे
By admin | Published: November 23, 2014 12:12 AM2014-11-23T00:12:19+5:302014-11-23T00:12:19+5:30
डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना गैरप्रकार थांबवले तर तीही एक समाजसेवाच ठरेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
Next
पुणो : डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना गैरप्रकार थांबवले तर तीही एक समाजसेवाच ठरेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
गेल्या 34 वर्षापासून भारताबाहेर वास्तव्य असूनही सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक संस्थांच्या कार्याशी एकरूप झालेल्या धनंजय केळकर यांच्या चित्रंचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात भरवण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी डॉ. मंदा आमटे, ‘शाश्वत’ या संस्थेच्या संचालिका कुसुमताई कर्णिक, कल्याण पांढरे उपस्थित होते. याप्रदर्शनाच्या माध्यमातून गोळा होणारा निधी हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि कुसुमताई कर्णिक यांच्या शाश्वत या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 23 नोव्हेंबर्पयत खुले राहणार आहे.
सतत दुस:यांसाठी काम करणो, अडीअडचणीला मदत करणो हे बाबा आमटेंनी त्यांच्या कामातून नेहमीच दाखवून दिले. ‘लोकबिरादारी’च्या निसर्गाशी संवाद साधतच आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
-डॉ. प्रकाश आमटे
स्वत:ची कला ‘आर्ट ऑफ गिव्हिंग’च्या माध्यमातून समाजसेवी कार्यासाठी वापरता आली याचा आनंद आहे. निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना अनुभवलेले गहरेपण आणि भावलेले प्रसंग जलरंग व तैलरंगातून साकारली.
- धनंजय केळकर
सामाजिक बांधिलकीचे उदाहरण
4‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट बघून एका लहान मुलाने चित्रपट आवडल्याने त्यातून प्रेरणा घेऊन मोठेपणी असेच काम करेन व आता त्या करिता खाऊच्या पैशातून जमवलेले अडीच हजार रुपये तुम्हाला पाठवत आहे असे पत्र लिहिले असा अनुभव सांगून, सामाजिक बांधिलकी जपली जात आहे याकडे आमटे यांनी लक्ष वेधले.