डॉक्टरांच्या मुलास डेंगीची लागण
By admin | Published: November 24, 2014 12:34 AM2014-11-24T00:34:09+5:302014-11-24T00:34:09+5:30
भिगवण येथील एका डॉक्टराच्या मुलालाच डेंगीची लागण झाली आहे.
पळसदेव : भिगवण परिसरामध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. विशेषत: आजारी असलेले रुग्ण खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी जात असल्याने भिगवणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दफ्तरी पेशंटची नोंद होत नाही. भिगवण येथील एका डॉक्टराच्या मुलालाच डेंगीची लागण झाली आहे. या मुलावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
विविध खासगी दवाखान्यांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत होते. संबंधित रुग्ण हा भिगवणमधील एका डॉक्टराचा मुलगा आहे. सुरुवातीला त्याच्यावर त्यांच्याच रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, मात्र नंतर त्यास बारामती व तिथून पुणे येथे उपचारार्थ नेण्यात आले. (वार्ताहर)