पर्यावरण, एड्स जागृतीसाठी डॉक्टरांची सायकल वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:06+5:302021-07-14T04:13:06+5:30
गेली अनेक वर्षांपासून परभणी येथील होमिओपॅथिक अॅकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएएआरसी) संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. आळंदी ...
गेली अनेक वर्षांपासून परभणी येथील होमिओपॅथिक अॅकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएएआरसी) संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. आळंदी ते पंढरपूर सायकल वारीचे श्रीक्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या सानिध्यात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन मोहीम सुरू केली. या वेळी सायकलिंग अवेअरनेस पुणे तर्फे सायकलिस्ट सतेज नाझरे, सचिन घोगरे, प्रगती बनसोड-नाझरे, आळंदी स्थित वेद संस्थेचे हभप स्वामिराज भिसे, तुषार झरेकर आदी उपस्थित होते.
ही आठवी सायकल वारी असून दरवर्षीप्रमाणे एचआयव्ही संक्रमित अनाथ बालकांचे मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन तसेच एड्सविषयी जनजागृती, वाढत्या इंधन दरवाढीसाठी सायकल टू वर्कचा वापर अर्थात दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करणे, ज्यामुळे पेट्रोलची बचत होईल, तसेच सायकलिंगमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाची जपवणूक होईल. तसेच नियमितपणे सायकलिंगमुळे प्रतिकारशक्ती वाढते. या कारणांमुळे नागरिकांनी सायकलचा वापर करावा. यासाठी जनजागृती केली जात आहे.