डॉक्टरकीचं कर्तव्य आणि आईची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:19+5:302021-05-28T04:08:19+5:30

त्या रुग्णाचे ऑक्सिजन लेव्हल कमी-जास्त होत होते. डॉ. स्वाती आणि सहकारी डॉ. आनंदनी रात्रभर ऑक्सिजन लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्नांची ...

Doctor's duty and mother's involvement | डॉक्टरकीचं कर्तव्य आणि आईची घालमेल

डॉक्टरकीचं कर्तव्य आणि आईची घालमेल

googlenewsNext

त्या रुग्णाचे ऑक्सिजन लेव्हल कमी-जास्त होत होते. डॉ. स्वाती आणि सहकारी डॉ. आनंदनी रात्रभर ऑक्सिजन लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली आणि सकाळी त्यांना यश आले. काही औषधी आणि injection आणि नातेवाईकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले आणि रुग्ण हळूहळू सामान्य होऊ लागला.

डॉ. स्वाती पुन्हा सकाळी 5 वाजता घरी आली, सासूबाईंनी सॅनिटायजर स्प्रे केला. पुन्हा तेच स्नान आणि सारे आटपून ती मुलांच्या रूममधे आली आणि तिला आठवण झाली कालच्या रात्रीची आणि हर्षची. किती आनंदाने रात्री एक घास घेतला होता तोंडात त्याने आणि एकच पोळी खाल्ली असेल आणि नेहाच काय झाल.? हे ही विचार डोक्यात आले

इतक्यात सासूबाई म्हणाल्या, ‘मी त्यांना खिचडी करून दिली होती गं स्वाती रात्री आणि मी ही खाल्ली.’

मुलं त्यांच्या रूममधे झोपली होती.

डॉ. स्वातीने हर्ष आणि नेहाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरविला . डॉ. स्वातीच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब हर्षच्या कपाळावर टपकले आणि तो झोपेत हसला अगदी त्याच्या डॉ. बाबासारखा. आणि इतक्यात नेहा उठली आणि म्हणाली, ‘आई कधी आलीस? रात्री तू जेवलीच नाही ना?’ आई म्हणाली, ‘बाळा अगं आमचा रुग्ण नीट झाला आणि त्याचे ऑक्सिजन लेव्हल सामान्य झाले तेव्हाच आमचे पोट भरले होते.’ नेहाने आईचा हात हातात घेऊन ती आईला बिलगली.

--

लेखक : गिरीश वसेकर (देशपांडे), (लेखक बीएसएनएल येथील सेवानिवृत्त लेखाधिकारी आहेत.)

Web Title: Doctor's duty and mother's involvement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.