डॉक्टरचे ‘फेसबुक अकाउंट’ केले हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:47+5:302021-04-29T04:06:47+5:30

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील भगवती क्लिनिकचे डॉ. सुधीर कदम यांचे दुसरे फेसबुक अकाउंट काढून या अकाउंटवरून फेसबुकच्या सर्व मित्रांना ...

Doctor's 'Facebook account' hacked | डॉक्टरचे ‘फेसबुक अकाउंट’ केले हॅक

डॉक्टरचे ‘फेसबुक अकाउंट’ केले हॅक

Next

सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील भगवती क्लिनिकचे डॉ. सुधीर कदम यांचे दुसरे फेसबुक अकाउंट काढून या अकाउंटवरून फेसबुकच्या सर्व मित्रांना पैशांची मागणी केली जात आहे. डॉ. कदम यांचे फेसबुक मित्र ग्रामसेवक हनुमंत भंडलकर यांनी चक्क हॅकरच्या अकाउंटवर १० हजार रुपये भरले आहेत. हॅकरने डॉ. कदम यांचे बनावट फेसबुक अकाउंट काढले आहे. काल रात्री हे फेसबुक अकाउंट काढले आहे. या अकाउंटवरून फेसबुकवरच्या सर्वच मित्रांना मी अडचणीत आहे, माझे घरचे दवाखान्यात आहेत. पैशांची अडचण आहे, अशी मागणी केली जात आहे. आज सकाळी डॉ. कदम यांचे फेसबुक मित्र हनुमंत भंडलकर यांनी हॅकरच्या अकाउंटला १० हजार भरले.

दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे व सहायक पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली. डॉ कदम यांचे पुत्र अनिकेत कदम यांनी सायबर सेलला इमेल करून तक्रार केली आहे.

————————————————

Web Title: Doctor's 'Facebook account' hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.