डॉक्टर सुध्दा झाले वारकरी, आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:42 PM2023-06-08T18:42:15+5:302023-06-08T18:42:28+5:30

शनिवारी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Doctors have also become Varkari, health department is ready for Asadhi Wari | डॉक्टर सुध्दा झाले वारकरी, आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

डॉक्टर सुध्दा झाले वारकरी, आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

googlenewsNext

देहूगाव : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सेवा करण्यासाठी दाखल झालेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून संपुर्ण गावातून आरोग्य दिंडीचे आयोजन केले होते. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन सूर्यवंशी, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, डॉ वंदना गवळी, डॉ. शिरसाट, डॉ. लोहार, डॉ.गोंधळकर, डॉ. पवार, डॉ. पूनम गुडले, आरोग्य विस्तार अधिकारी महेश वाघमारे, बजरंग चोरमले,पंकज कामत, सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहायिका, आरोग्य सेवक व सेविका आदी सहभागी झाले होते. या दिंडीचे आयोजन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले होते. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते मुख्यमंदिर आणि मुख्यमंदिर ते वैकुंठगमन मंदिर अशी काढण्यात आली. व वैंकुपठमंदिर येथे समारोप करण्यात आला. या दिंडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आषाढी वारीला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सज्ज आहोत हा संदेश देत होते. आम्ही ही आलो तुम्ही ही या अशा अर्थाने त्यांनी भाविकांच्या बद्दल असणाऱ्या भावना व्यक्त करीत दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीमुळे गावात डॉक्टर सुध्दा झाले वारकरी अशी भावना होती.

Web Title: Doctors have also become Varkari, health department is ready for Asadhi Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.