डॉक्टर, पोलीस, शिक्षकांबरोबरच पत्रकारही कोरोना योद्धे : ढमढेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:21+5:302021-07-15T04:08:21+5:30
कार्यक्रमास संस्थेचे सचिव सूर्यकांत खैरे, संचालक अरुण थोरात आणि भांडगावच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक कदम उपस्थित होते. ...
कार्यक्रमास संस्थेचे सचिव सूर्यकांत खैरे, संचालक अरुण थोरात आणि भांडगावच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक कदम उपस्थित होते. महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी पत्रकार संदीप चाफेकर, वसंत मोरे, मंगेश कचरे, रमेश वत्रे, विजय चव्हाण, रवींद्र खोरकर, सखाराम शिंदे, मानसिंग रुपनवर, प्रकाश शेलार, संदीप सोनवणे, संतोष काळे, संदीप नवले, बाळासाहेब मुळीक, बापू नवले, डॉ. हरिभाऊ बळी ,अहिरेश्वर जगताप, गणेश खळदकर आदी २६ पत्रकारांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून 'कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले.
पत्रकारांच्या वतीने रमेश वत्रे आणि विजय चव्हाण यांनी विचार व्यक्त केले. ‘सहजयोगा’चा अल्पमुदतीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या निवडक १४ विद्यार्थ्यांना ह्या प्रसंगी सन्मानित पत्रकारांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सहायक प्राध्यापक धनंजय भिसे ह्यांनी केले . शेवटी आभार प्रदर्शन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक सहायक प्राध्यापक अनिल सोनवणे यांनी मानले.
खुटबाव (ता.दौंड) येथे भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकारांना "कोरोना योद्धा" पुरस्कार देण्यात आला.