कोविड सेंटरसाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा: बेनके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:08+5:302021-04-18T04:09:08+5:30
नारायणगाव येथील डॉ. सागर फुलवडे यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अवनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. २० बेडची या ...
नारायणगाव येथील डॉ. सागर फुलवडे यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अवनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. २० बेडची या सेंटरची क्षमता आहे. २० पैकी १४ ऑक्सिजन बेड आहेत, तर ६ आयसोलेशन बेड आहेत. मधुमेह व हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत हे या कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचारांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. आमदार बेनके यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उदघाटन झाले. यावेळी बेनके म्हणाले की, "सर्वसामान्य कोरोनाबाधित रुग्णांना हे हॉस्पिटल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. डॉ. फुलवडे यांनी सामाजिक बांधिलकीतून हे कोविड सेंटर सुरू करून तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला हातभार लावला आहे.आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत.तालुक्यातील सर्व कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहेत.लेण्याद्री येथे आणखी एक नवीन स्वतंत्र कोविड केअर सेंटर लवकरच सुरू केले जाणार आहे." ,
"सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र आहे.बेड व इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक प्रचंड धावपळ करत आहेत.जुन्नर तालुक्यात पुढील आठ दिवस रेमडेसिविर पुरतील एवढा साठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे."
अतुल बेनके,आमदार,जुन्नर
"माझ्या दोन मित्रांना ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नाहीत.खूप धावपळ करून देखील आणि पुण्यासारख्या ठिकाणी अनेक हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून देखील त्यांना बेड मिळाले नाहीत,केवळ हीच बाब लक्षात घेऊन व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून मी हे कोविड सेंटर सुरू केले आहे.शासकीय नियमानुसार व शासकीय दराप्रमाणे बिल आकारले जाईल."
डॉ.सागर फुलवडे,संचालक
अवनी कोविड सेंटर,नारायणगाव
नारायणगाव येथे डॉ.सागर फुलवडे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे हस्ते झाले.