डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

By admin | Published: April 17, 2015 12:51 AM2015-04-17T00:51:24+5:302015-04-17T00:51:24+5:30

उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना हडपसर येथे घडली होती.

Doctor's work stop movement | डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

Next

पुणे : उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना हडपसर येथे घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शिवणे, उत्तमनगर, कोंढवा परिसरातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले.
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ उत्तमनगर-शिवणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने रॅली काढण्यात आली होती.
शिवणे येथे डॉक्टरांनी एकत्र येऊन निदर्शने केली. रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांवरच रुग्णांकडून हल्ले होत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे मत डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आले. या काम बंद आंदोलनात डॉ. भालचंद्र कदम, डॉ. देसाई, डॉ. दत्ता आंधळे, डॉ. किरण जाधव, डॉ. महावीर बागरेचा इत्यादींचा समावेश होता. (वार्ताहर)

हडपसर येथील रुग्णालय तोडफोडीच्या घटनेचा सर्व डॉक्टर निषेध करतो. रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत आणि त्याचे प्राण वाचावेत यासाठी डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतात. याचे भान ठेवून नागरिकांनी हल्ल्याच्या घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- डॉ. दत्ता आंधळे

Web Title: Doctor's work stop movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.