चळवळीचा इतिहास होणार चित्रबद्ध, भारत पाटणकर-गेल आॅम्व्हेट यांच्यावर माहितीपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 08:07 PM2017-12-17T20:07:04+5:302017-12-17T21:03:48+5:30

सामाजिक चळवळीत चार दशकांहून अधिक काळ पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करीत कष्टकरी राबणाºया जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची चळवळ करणारे..

Documentary on Bharat Patankar-Gayle's Avatar, will be the history of the movement | चळवळीचा इतिहास होणार चित्रबद्ध, भारत पाटणकर-गेल आॅम्व्हेट यांच्यावर माहितीपट

चळवळीचा इतिहास होणार चित्रबद्ध, भारत पाटणकर-गेल आॅम्व्हेट यांच्यावर माहितीपट

googlenewsNext

धनाजी कांबळे

पुणे :  सामाजिक चळवळीत चार दशकांहून अधिक काळ पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करीत कष्टकरी राबणाºया जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची चळवळ करणारे डॉ. भारत पाटणकर आणि दलित, स्त्रीवादी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल आॅम्व्हेट या जोडप्याच्या जीवनाचा लेखाजोखा मांडणारा माहितीपट नव्या वर्षांत प्रदर्शित होणार आहे. टाटा सामाजिक संशोधन संस्थेत पीएचडी करणाºया सोमनाथ वाघमारे या तरुण दिग्दर्शकाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

डॉ. भारत पाटणकर यांनी धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून अविरत संघर्ष सुरू ठेवलेला आहे. विकासाच्या प्रकल्पांना केवळ विरोध न करता सक्षम आणि भक्कम पर्याय देण्याची चळवळ बांधण्यात पाटणकर यांचा मोठा सहभाग आहे. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, डॉ. बाबा आढाव यांच्याबरोबरच अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबरीने भारत पाटणकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात समान पाणी वाटपाची चळवळ उभी केली आहे. त्यामाध्यमातून सरकारला समान पाणी वाटपाचे धोरण राज्यभर राबविण्याबाबतचा अहवाल दिला असून, त्यादृष्टीने पथदर्शी प्रकल्प म्हणून सांगली जिल्ह्यात प्रयोग सुरू आहे. चित्रीसारख्या धरणातील बाधित शेतकºयांचे पुनर्वसन होण्याच्या लढ्यात भारत पाटणकर, धनाजी गुरव आणि त्यांच्या चळवळीचा मोठा सहभाग राहिलेला आहे. सांगली जिल्ह्यातील बळीराजा धरणाने महाराष्ट्रात एक एतिहास घडविला आहे. या सर्व प्रयोग आणि लढ्यांसाठी आयुष्य खर्ची घातलेल्या पाटणकर यांचे वैचारिक योगदानही समाजबदलाच्या लढाईत महत्त्वपूर्ण राहिलेले आहे, त्याचाही आढावा या माहितीपटात घेण्यात आल्याचे सोमनाथ वाघमारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

डॉ. भारत पाटणकर यांनी ऐन तारुण्यात चळवळीत उडी घेतली. डॉक्टरकीची पदवी असतानाही वैयक्तीक पातळीवर डॉक्टरकीतून कुटुंबाचा उद्धार करण्याऐवजी समाजाचा डॉक्टर बनण्यासाठी घेतलेला निर्णय कुणालाही अचंबित करणाराच आहे. अमेरिकेतून भारतात पीएडीच्या कामानिमित्त संशोधनासाठी आलेल्या डॉ. गेल आॅम्व्हेट यांनी याच अचंब्यातून त्यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर दोघेही समाजबदलाच्या, मानवमुक्तीच्या लढ्याचे सारथी बनले. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीरामजी यांच्यासोबत राहिलेल्या आणि भारतात बौद्ध धम्माच्या चळवळीला वैचारिकदृष्ट्या सर्वदूर पसरविणाºया डॉ. गेल आॅम्व्हेट यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणि त्यांच्या लेखक, कार्यकर्ता, विचारवंत म्हणून दिलेल्या योगदानाचाही धावता आलेख यात आहे. सत्यशोधक चळवळ आणि फुले-आंबेडकरांचे जातीअंताच्यादृष्टीने असलेले योगदान याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. गेल आॅम्व्हेट भारतात आल्या होत्या. त्यांच्या शिक्षिका डॉ. अ‍ॅलिना झेनेट यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी या विषयांत आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन केले आहे, त्याबद्दलचीही माहिती यात असल्याचे सोमनाथ वाघमारे यांनी सांगितले.

पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर एफटीआयआयमध्ये नोकरी करतानाच चळवळीसोबत होतोच. खूप मोठमोठ्या विभूती आपल्या आजूबाजूला असतात, मात्र त्यांच्या कार्यकतृत्वाचा इतिहास कधी चित्रबद्ध होत नाही. तो फक्त पुस्तकरुपाने साठवला जातो. मात्र, त्यांचे हावभाव, छबी आणि एकूण व्यक्तीमत्वातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी डॉ. भारत पाटणकर आणि डॉ. गेल आॅम्व्हेट यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा माहितीपट बनविण्याचा विचार मनात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर या दोघांच्या कामाची दखल घेतली जायला हवी, इतके प्रचंड मोठे काम त्यांनी हयातभर केले आहे. त्यामुळे जुने संदर्भ शोधत, तपासत काही छायाचित्रे जमा करण्याचे काम सुरू होते. तसेच  चित्रीकरणाचेही काम दुसºया बाजूला सुरू आहे. नव्या वर्षांत साधारण मेमध्ये हा माहितीपट सर्वांसाठी खुला करण्यात येईल, असा विश्वास वाटतो.

-  सोमनाथ वाघमारे, निर्माता-दिग्दर्शक

Web Title: Documentary on Bharat Patankar-Gayle's Avatar, will be the history of the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.