‘दे आर डाईंग’ माहितीपटाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:46+5:302020-12-02T04:06:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आज अनेक भाषा अशा आहेत, ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आज अनेक भाषा अशा आहेत, ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे या जाणीवेतून निर्मित केलेल्या ‘दे आर डाईंग’ या माहितीपटाची २२ व्या मदुराई आंतरराष्ट्रीय लघुपट माहितीपट महोत्सवामध्ये निवड केली आहे. हा महोत्सव डिसेंबर महिन्यात होणार असून, यंदाचा महोत्सव लोकशाही संकल्पनेवर आधारित आहे.
या माहितीपटाचे दिग्दर्शन धनंजय भावलेकर यांनी तर गणेश पडवळ यांनी छायाचित्रण व तुषार सकपाळ यांनी संकलन केले आहे.
भारतामधील सामाजिक रचनेनुसार येथील मानवी समूहांमध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. देशातील निरनिराळ्या समूहांच्या भाषांमध्ये असणारे वैविध्य, भाषेची संपन्नता इतर देशांच्या तुलनेने अधिक आहे. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात भाषा लोप पावत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा वारसा जतन करणे, ज्या भाषांच्या स्वतंत्र लिपी आहेत किंवा ज्या केवळ मौखिक स्वरुपात आहेत अशा भारतामधील जवळपास ७८0 भाषांची नोंद झालेली आहे. लिखित स्वरुपातील राज्यनिहाय वेगवेगळ्या खंडात दस्तऐवजीकरण भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण खंडात झालेले आहेच. मात्र ते फक्त अभ्यासकांपुरतेच मर्यादित असल्याने ‘भाषा’ ध्वनि आणि छायाचित्रणाच्या स्वरुपात संवर्धित करण्याचे महत्वाचे काम सध्या सुरू केले आहे. जेणेकरून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना भाषा आणि जीवन एकमेकांमध्ये कसे गुंतले आहे याचे आकलन होईल, भारतातील राजस्थान या राज्यातील नामशेष होत असलेल्या धावरी, थाली आणि धाटकी या काही प्रमुख समुहांच्या भाषा संस्कृतीचे छायाचित्रण व ध्वनिमुद्रण केले आहे.‘भाषा’ या संस्थेच्या सहकार्याने मोशन पिक्चर्स या आमच्या संस्थेने छायाचित्रण व ध्वनिमुद्रणाचे काम केले आहे. त्याचाच भाग म्हणून ‘दे आर डाईंग’ हा माहितीपट तयार केल्याची माहिती दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी दिली.