कागदपत्रे, पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:36 AM2017-12-10T01:36:14+5:302017-12-10T01:36:22+5:30

झारगडवाडी (ता.बारामती) येथील राहुल धुमाळ यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट भिवरी (ता. पुरंदर) येथील समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या माऊली घारे यांनी संपर्काच्या माध्यमातून प्रामाणिकपणे परत केले.

 Documents, money laundering made honestly back | कागदपत्रे, पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत

कागदपत्रे, पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे केले परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गराडे : झारगडवाडी (ता.बारामती) येथील राहुल धुमाळ यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट भिवरी (ता. पुरंदर) येथील समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या माऊली घारे यांनी संपर्काच्या माध्यमातून प्रामाणिकपणे परत केले.
नुकतेच राहुल धुमाळ झारगडवाडी (ता. बारामती)वरून गराडे येथे आपल्या बहिणीला सोडायला आले होते. मेहुणे राजूअण्णा ढगारे यांची गाठभेट घेऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले. ते प्रवास करत असलेल्या एसटीमध्ये त्यांची महत्त्वाची मूळ कागदपत्रे व २५०० रुपये असलेले पैशांचे पाकीट पडले. नंतर लक्षात आल्यावर त्यांनी खूप शोधाशोध केली. परंतु कागदपत्रे व पैशांचे पाकीट काही मिळाले नाही. कंटाळून राहुल धुमाळ झारगडवाडीला निघून गेले. या संपूर्ण घटनेनंतर धुमाळ यांना कागदपत्रे व पैशाचे पाकीट मिळणार नाही, असे मनोमन वाटत होते.
ती महत्त्वाची मूळ कागदपत्रे व पैशांचे पाकीट श्रीक्षेत्र कोडीत येथील माऊली घारे यांची कन्या शशिकला विजय खैरे यांना एसटीमध्ये सापडले. त्या आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त माहेरी भिवरी येथे निघाल्या होत्या. तेथे पोहोचताच सापडलेली कागदपत्रे व पैशांचे पाकीट याची सर्व माहिती वडील माऊली घारे, आई सावित्रा घारे व भाऊ शिवाजी घारे यांना सांगितली.
माऊली घारे यांनी तातडीने ही गोष्ट आपले मित्र पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील लोणकर व शिवाजी घारे यांनी बारामती येथील मित्र प्रशांत निंबाळकर यांना सांगितली.

माऊली घारे यांनी राहुल धुमाळ व राजूअण्णा ढगारे यांना चहा, नाष्टा देऊन विचारपूस करून कागदपत्रे व पैशांचे पाकीट परत दिले. या वेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गुलाब घिसरे, उपसरपंच भाऊसाहेब कटके, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, पोलीस गुप्तवार्ता विभागप्रमुख बी. टी. जगदाळे, ग्रा. पं. सदस्य शंकरनाना कटके, शिवाजी घारे, मार्तंड दळवी, सुहास कटके, सागर दळवी, नवनाथ भिसे, हिरामण कटके आदींसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Documents, money laundering made honestly back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे