बारामती नगरपरिषदेला कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी? ‘मनसे’चं घोषणाबाजीसह आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:33 PM2021-08-30T19:33:02+5:302021-08-30T19:33:41+5:30

बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना सुरु आहे

Does anyone give Baramati Municipal Council a Chief Officer? MNS agitation with sloganeering | बारामती नगरपरिषदेला कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी? ‘मनसे’चं घोषणाबाजीसह आंदोलन 

बारामती नगरपरिषदेला कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी? ‘मनसे’चं घोषणाबाजीसह आंदोलन 

googlenewsNext

बारामती : बारामती नगरपालिकेचा जवळपास अडीच  महिन्यांपासुन कारभार सुरु आहे. मुख्याधिकारी नसल्याने नागरपालिकेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना देखील अडचणी निर्माण होत आहेत.या पार्श्वभूमीवर मनसेनं मुख्याधिकारी देता का? असा सवाल व्यक्त करणारे फलक हाती घेत नगरपरिषदेसमोर रस्त्यावर उतरत सोमवारी (दि. ३०) घोषणा देत पध्दतीने आंदोलन केले. 

बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना सुरु आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत. जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत. जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड काळात मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना देखील अडचण आहे. बारामती तालुक्यातील नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्येपेक्षा कित्येक पटीने जास्त असताना देखील बारामतीत मुख्याधिकारी नसणं हि लाजिरवाणी बाब आहे. 

बारामती नगरपरिषदेला उपमुख्याधिकारी कसलीही जबाबदारी न घेता सरळ नागरिकांना सांगतात की ,तुम्ही जाऊन प्रांत साहेबांना भेटा. नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणाचा वचक नसल्याचे चित्र आहे, त्यातून  कामासाठी टाळाटाळ होत आहे.मुख्याधिकारी नसल्याचे कारण पुढं करत प्रत्येक काम टाळलं जात आहे. बारामतीत नगरपालिकेला मुख्याधिकारी नियुक्त होण्यास विलंब का लागतो, असा देखील प्रश्न लोकांना पडला आहे.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, बारामती तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, स्वप्नील मोरे, प्रवीण धनराळे, अमोल गालिंदे, भार्गव पाटसकर यांनी कोणी मुख्याधिकारी देता का,बारामती नगरपालीकेला मुख्याधिकारी मिळेना,अशा आशयाचे फलक हाती घेत आंदोलन केले.

Web Title: Does anyone give Baramati Municipal Council a Chief Officer? MNS agitation with sloganeering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.