कोरोना केवळ वारीतूनच पसरतो का? विश्व हिंदू परिषदेचा सवाल; १७ जुलैै रोजी राज्यव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:22+5:302021-07-16T04:10:22+5:30
पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदचे प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री विजय देशपांडे, देहू संस्थानाचे विश्वस्त ह. भ. प. ...
पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदचे प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री विजय देशपांडे, देहू संस्थानाचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजीमहाराज मोरे, धर्मयात्रा महासंघाचे अध्यक्ष ह. भ. प. भानुदास महाराज तुपे, ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. धर्मराज महाराज हांडे, विभाग मंत्री तुषार कुलकर्णी आदी उपस्थित होते. साधुसंतांची, वारकऱ्यांची अवहेलना न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी रस्त्यावर उतरेल, असे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सांगितले.
शंकर गायकर म्हणाले, ‘शासनाने-प्रशासनाने वारकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली. सरकारने वारकऱ्यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. विविध सरकारी कार्यक्रमांत, पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात जमणाऱ्या कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी करण्यात येते का? पंढरपुरातच झालेल्या मतदान प्रक्रियेच्या प्रचारसभांना कोरोनाची नियमावली लागू होत नव्हती का? कोरोना हा फक्त आषाढी-कार्तिकीच्या वारीतच वाढतो आणि वारकऱ्यांमार्फतच पसरतो का?’