रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का? आधी कोरोना टेस्ट करून घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:25+5:302021-07-08T04:09:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कमी झालेल्या रेल्वे गाड्याची संख्या आता पुन्हा वाढली आहे. प्रवासी संख्येतदेखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कमी झालेल्या रेल्वे गाड्याची संख्या आता पुन्हा वाढली आहे. प्रवासी संख्येतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे काही राज्य सरकारने कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे गरजेचे असून प्रवाशांनी तो जवळ बाळगावा असेही आवाहन केले आहे.
कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश आदी प्रमुख राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांकरीता आरटीपीसीआरची चाचणी अनिवार्य केली.
बॉक्स १
सध्या सुरू असलेले रेल्वे :
पुणे - मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, पुणे - हावडा दुरांतो एक्सप्रेस, पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, पुणे - जम्मू तावी झेलम एक्सप्रेस, पुणे -दानापूर एक्सप्रेस, कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, आदी सह पुणे स्थानकावरून प्रवास सुरु करणाऱ्या जवळपास पन्नास रेल्वे सुरू झाल्या आहेत.
बॉक्स २
या रेल्वे कधी सुरू होणार :
पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड, प्रगती एक्सप्रेस, पुणे -मुंबई इंटरसिटी, पुणे - सोलापूर इंटरसिटी, पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस, कोल्हापूर- मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, पुणे - बिलासपूर, पुणे - लखनऊ एक्सप्रेस या गाडया अद्यापही बंद आहेत.
बॉक्स ३
पॅसेंजर कधी सुरू होणार ?
पॅसेंजर गाड्याचे घोडे कुठे अडले :
पॅसेंजर गाड्यातून रेल्वेला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे प्रशासन पॅसेंजर गाड्याची सेवा बंद करणार आहे. तसेच येणाऱ्या नवीन झीरो बेस टाईम टेबलमध्ये अनेक गाड्या रद्द तर अनेक गाड्यांचे थांबे रद्द होणार आहे. हे टाईम टेबल डिसेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी पॅसेंजर गाड्याचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होईल.
बॉक्स ४
कोरोना टेस्ट, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक ज्या राज्यानी निर्बंध लावले आहेत. त्या राज्यात रेल्वेने जाताना कोरोना टेस्ट केलेली असावी. तसेच आपले जर लसीकरण झाले असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील सोबत ठेवणे उचित होईल. त्यामुळे प्रवाशांनी दुसऱ्या राज्यात ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कोट :
प्रवासी ज्या राज्यात जात आहेत त्या राज्याचे निर्बंधाचे पालन करावे. रेल्वे त्या बद्दलची माहिती तिकीट काढताना सिस्टीमवर व स्थानकावर देत आहे.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.