व्हेंटिलेटर देता का व्हेंटिलेटर? दौंड तालुक्यात रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:38+5:302021-04-13T04:11:38+5:30
तालुक्यातील सर्व व्हेंटिलेटर सध्या कोरोना पेशंटमुळे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. २४ तास व्हेंटीलेटर चालू असल्यामुळे मशीनवरही ताण आला आहे. ...
तालुक्यातील सर्व व्हेंटिलेटर सध्या कोरोना पेशंटमुळे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. २४ तास व्हेंटीलेटर चालू असल्यामुळे मशीनवरही ताण आला आहे. व्हेंटिलेटरची संख्या कमी त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. तालुक्यामध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये ५०० कोरोना पेशंटचे नातेवाईक वेंटीलेटरसाठी मागणी करत आहेत. यामध्ये तालुक्यातील कोरोणा रुग्णाची संख्या आहेत त्याहीपेक्षा आसपासच्या पुणे शहर, बारामती, शिरूर, इंदापूर या तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
--
कोट
परिस्थिती अतिशय गंभीर आहे. दररोज रुग्ण वाढत आहेत. त्या तुलनेत सुविधा देणे गरजेचे आहे. प्रशासनाकडे नवीन व्हेंटिलेटरसाठी मागणी केली आहे. याशिवाय तालुक्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी सातशे बेडची व्यवस्था आगामी आठ दिवस संबंधित करण्यावर आमचा भर राहिल. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
सुरेखा पोळ,
तालुका आरोग्य अधिकारीी