कुणी पाणी देता का पाणी?

By admin | Published: May 2, 2015 05:29 AM2015-05-02T05:29:40+5:302015-05-02T05:29:40+5:30

तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही.

Does water supply water? | कुणी पाणी देता का पाणी?

कुणी पाणी देता का पाणी?

Next

पुणे : तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही. महापालिकेकडून मानकांपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जात असल्याचे कारण पुढे करून पाटबंधारे विभागाकडून २०११ नंतर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणारा करारही करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य पद्धतीने सुनियोजन होत नसल्याने दरवर्षी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे तट पेटत आहेत.
महापालिकेस शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस सध्याची लोकसंख्या गृहीत धरता दरमहा सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शहरासाठी पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जवळपास १५ ते १६ टीएमसी पाणी घेतले जाते. मात्र, कागदपत्रावर कुठेही या पाण्याच्या देवाणघेवाणीचा करार झालेला नाही. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस दरदिवशी १२५0 ते १३00 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानुसार, १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर भविष्यात शहराचा विस्तार गृहीत धरत महापालिकेस १९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. राज्यशासनाने महापालिकेत आणखी नवीन ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आणखी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Does water supply water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.