कुत्र्याकडून चिमुकल्याच्या डोळ्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:37 AM2017-12-29T01:37:14+5:302017-12-29T01:37:24+5:30

चंदननगर : दीड वर्षाच्या मुलावर आज खराडीत भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या मुलाच्या चेहरयाचा चावा घेतल्याने मुलाच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

Dog bites from a dog | कुत्र्याकडून चिमुकल्याच्या डोळ्याचा चावा

कुत्र्याकडून चिमुकल्याच्या डोळ्याचा चावा

Next

चंदननगर : दीड वर्षाच्या मुलावर आज खराडीत भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या मुलाच्या चेहरयाचा चावा घेतल्याने मुलाच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. मनित गाडेकर (रा. खराड़ी) असे जखमी मुलाचे नाव असून तो मित्रांसोबत अंगणात खेळत होता. त्यावेळी त्याची आई जवळ होती. आईने त्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. एका खाजगी रुग्णालयात त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मनितचे वडील पुणे महापालिकेचे कर्मचारी आहेत.
अचनाक हल्ला करणाºया कुत्र्याने त्याच्या उजव्या डोळ्याची पापनी फाडली आहे. त्यामुळे त्याचा डोळाच बाहेर आला होता. मणितच्या डोळ्याजवळ कुत्र्याच्या चाव्यामुळे आठ दात लागले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मनपा श्वानपथकाला आता तरी जाग येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.याची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे.आन्यथा नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशाराच काही संघटनांनी दिला आहे. वडगावशेरी, सोमनाथनगर, जुना मुंढवा-खराडी रस्ता, खराडी गावठाण, खुळेवाडी, चौधरीवस्ती, चंदननगर या सर्वत्र भागांत भटक्या कुत्र्यांचा सर्रास वावर वाढला आहे. वरील भागात मुख्यत: कचराकुंड्याशेजारी तर टोळक्यानेच कुत्री बसलेली असतात. एवढेच नव्हे तर या कुत्र्याच्या टोळक्यांनी सध्या त्यांचा मोर्चा सोसायटीचे पार्किंग, शाळेचा परिसर, तसेच हातगाडीजवळील अन्नपदार्थांशेजारी वळवला आहे. तेव्हा या सर्व ठिकाणी असणारी लहान मुले, वयोवृद्ध तसेच शाळकरी मुले यांच्यावर टोळक्याने झुंडीने धावून जात आहेत व लहानग्यांचा बिनधास्तपणे चावा घेऊन अंगाचे लचके तोडत आहेत.
गेल्या वर्षी खराडीमध्ये असाच भटक्या कुत्र्याच्या चाव्याने एकाचा मृत्यू ओढवला होता. खराडी, चंदननगर, वडगावशेरीत भटक्या व रोगट कुत्र्यांचा बिनधास्त उच्छाद सुरू आहे. आठवड्यातून एकदा कुत्र्याने हल्ला केला नाही अशी घटना नाही, अशी नागरिकांनी माहिती दिली.
मनपाचे श्वानपथक घटनेची जबाबदारी घेत नसल्याचे बोलले जात आहे. श्वानपथकाने ताबडतोब बंदोबस्त करावा; अन्यथा नागरिक मोठे आंदोलन उभे करतील यात शंका नाही. प्रभाग क्र. ३ विमाननगर -सोमनाथनगर, प्रभाग क्र. ५ खराडी-चंदननगर, प्रभाग क्र. ५ वडगावशेरी-कल्याणीनगर या सर्व प्रभागांतील परिसरातील भागात सध्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांच्या त्रासाने नागरिक खास करून महिला व शाळकरी मुले हैराण झाली आहेत. या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेविका उषा कळमकर यांनी केली आहे. वडगावशेरीतील सुनीतानगर, सोमनाथनगर, वडगावशेरी गावठाण, शिवराज विद्यालय परिसर, जुना-मुंढवा रस्ता, खराडीगाव, चंदननगर, खुळेवाडीगाव व रस्ता, दर्गा, खराडी जुना जकातनाका, नागपाल रस्ता, चौधरीवस्ती रस्ता परिसर यांसह परिसरात या मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना त्रस्त केले आहे.
>भटक्या कुत्र्याकडून जखमी झालेल्या बालकाच्या हॉस्पिटलचा खर्च व भविष्यातील शिक्षणाची जबाबदारी पूर्णत: मनपाने घ्यावी. तसेच श्वानपथकाकडून भटक्या कुत्र्यांचा विषय ४ दिवसांत मार्गी न लावल्यास मनसे सहायक आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडून आंदोलन करणार.
-कल्पेश यादव, पुणे शहराध्यक्ष मनविसे
>महापालिकेच्या सर्व कामकाजाचे तीनतेरा वाजले असून महापालिका प्रशासन जाणूनबुजून खराडीकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी, पत्रव्यवहार करूनदेखील कसलीही दखल घेत नसल्यामुळे महापालिकेत ही मोकाट कुत्री सोडणार असून महापालिकेने या बालकाचा संपूर्ण खर्च करावा; अन्यथा ही मोकाट कुत्री महापालिकेच्या दालनात सोडणार आहे.
-बापूसाहेब पठारे, माजी आमदार वडगावशेरी
>महापालिकेने त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. मोकाट कुत्र्यांचा संख्या माणसांएवढी झाली असून मनपा श्वान पथकालाच का नाही सापडत ही मोकाट कुत्री, हाच मोठा गंभीर प्रश्न आहे.
-अ‍ॅड. भय्यासाहेब जाधव,
नगरसेवक, खराडी-चंदननगर
>जखमी मनित गाडेकरची मीच स्वत: रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हल्ल्यात मनित खूपच गंभीर जखमी झाला असून, त्याबाबत आज मी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला; मात्र अधिकाºयांनी या घटनेची गंभीर दखल घेतली नाही. - श्रीधर गलांडे,
नागरिक वडगावशेरी
>एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून दुसरा डोळा काळानिळा झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून मनितची प्रकृती आता बरी आहे.
- अण्णा गाडेकर, मनितचे वडील

Web Title: Dog bites from a dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा