फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लेम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTV कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:22 AM2023-08-10T10:22:15+5:302023-08-10T10:23:13+5:30
सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, लोकांनी प्रकरण लावून धरल्याने गुन्हा दाखल
किरण शिंदे
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या एका लेम्बोर्गिनी कार ने श्वानाला जोरात धडक दिली. या धडकेत श्वानाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुडलक चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात निळ्या रंगाच्या लेम्बोर्गिनी चार चाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीना नरेश राय (वय 57) या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या सामाजिक कार्यकर्ते आहेत. नुसार सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात धावणाऱ्या लेम्बोर्गिनी कार चालकाने गुडलक चौकात एका श्वानाला जोराची धडक दिली. यामध्ये श्वानाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता तितक्याच वेगाने पळून गेला.
फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लेम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल, घटना CCTV कैद#Pune#Accidentpic.twitter.com/dG2g31A0Cm
— Lokmat (@lokmat) August 10, 2023
घटनेनंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र फिर्यादी आणि अन्य काही लोकांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर कार मालकाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले मात्र गुन्हा दाखल करतेवेळी त्याचे नाव टाकले नाही असा आरोप फिर्यादी निना राय यांनी केला आहे. दरम्यान डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी भादवी 279, 429 सह प्राण्यास क्रूरता प्रतिबंध कायदा 11(1), 11 (A) (L) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.