गरजवंतांची कामे केल्यास राजकारणाचे समाजकारण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:03+5:302021-07-19T04:09:03+5:30
वालचंदनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रविराज मित्र मंडळाच्या माध्यमातून मोफत हृदयरोग व ...
वालचंदनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रविराज मित्र मंडळाच्या माध्यमातून मोफत हृदयरोग व आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी वालचंदनगर परिसरातील २८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६२ जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली. या शिबिराप्रसंगी दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा समन्वयक सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष मधुकर पाटील, अरुण वीर, युवानेते व आयोजक रविराज खरात, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष सचिन रणपिसे, राजेंद्र डोंबाळे, संदीप पाटील, राहुल अर्जुन, विजय चितारे, नवनाथ धांडोरे, सिद्धार्थ चितारे, भैयासाहेब सोनवणे, डॉ. कैलास नाळे, डॉ. रमेश निकम, हरिभाऊ हिंगणे उपस्थित होते.
वालचंदनगर परिसरातील डॉ. अनुराधा कांडलकर, डॉ. पोपट कुंभार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. विनोद तोडकर, डॉ. विकास शहा, डॉ. वासुदेवानंद आणि डॉ. अस्मिता दामले यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर भाजपचे बाळासाहेब डोंबाळे (ठाकरे) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
१८ वालचंदनगर
डॉक्टरांचा सन्मान करताना दत्तात्रय भरणे व इतर.