पालिकेत रंगतोय पत्त्यांचा डाव
By admin | Published: October 29, 2014 12:20 AM2014-10-29T00:20:54+5:302014-10-29T00:20:54+5:30
शहरात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी नसल्याच्या बोंबा महापालिका प्रशासनाकडून सतत मारल्या जातात.
Next
सुनील राऊत - पुणो
शहरात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी नसल्याच्या बोंबा महापालिका प्रशासनाकडून सतत मारल्या जातात. मात्र, या दोन्ही कारवाईसाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग आणि पोलीस पालिका भवनाच्या परिसरातच भर दुपारी रमी आणि तीन पत्तीचा जुगार खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी पालिका भवनाच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये अतिक्रमण विभागाच्या गाडय़ांमध्येच हा डाव रंगत असताना अधिका:यांसह सुरक्षा विभागाही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
शहरात दर वर्षी रस्त्यावर तब्बल 7क् ते 8क् हजार अतिक्रमणो होतात. तर त्यापेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामे होतात. ही अतिक्रमणो आणि बांधकामे रोखण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाकडून नियोजन केले जाते. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर विभाग करून या कारवाईसाठी पथकांची नेमणूक केलेली आहे. त्यात पोलीस आणि बिगा:यांचा समावेश असतो. या क्षेत्रीय पथकांना मदतीसाठी महापालिका भवनात सुमारे 31 बिगारी आणि 7क् पोलिसांचे पथक राखीव ठेवले जाते. हे पथक क्षेत्रीय पथकांना कारवाईस मदत करते.
या पथकाच्या तीन पिंजरा असलेल्या गाडय़ा दररोज पालिका भवनाच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये उभ्या असतात. या वाहनांची आज दुपारी पाहणी केली असता,त्या वेळी एका गाडीत अतिक्रमण विभागाचे पोलीस, तर दुस:या गाडीत बिगारी चक्क पत्ते खेळत असताना दिसून आले. विशेष म्हणजे हा खेळ पैशावर सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधीस दिसून आले. त्यानंतर दुपारी साडेतीन ते चार या वेळेत या गाडीजवळ थांबून आणखी माहिती घेतली असता, काही नागरिकांनी हा रोजचाच डाव असल्याचे सूचित वक्तव्य केले.
महापालिकेत असे गैरप्रकार होऊ नयेत, तसेच पालिका भवनाची सुरक्षाव्यवस्था सक्षम राहावी यासाठी पालिकेत स्वतंत्र सुरक्षा विभाग आहे. मात्र, या पूर्वी पालिकेत रात्रीच्या वेळी तळीरामांची जत्र रंगल्याचे समोर आले आहे. तर, आता चक्क दिवसाढवळया कर्मचारी पत्ते कुटत असल्याचे दिसत असतानाही सुरक्षाव्यवस्था काहीच करत नसल्याने त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे हा पत्त्यांचा डाव पालिका आयुक्त, तसेच अतिरिक्त आयुक्त्यांच्या खिडकीतूनही सहज दिसून येतो. असे असतानाही हा प्रकार थांबत का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिवसाढवळय़ा पत्तेबाजी
महापालिकेच्या आवारातच हे पोलीस आणि कर्मचारी दिवसाढवळय़ा कोणतीही तमा न बाळगता पत्ते पिसताना दिसून येत होते. विशेष म्हणजे या वेळी या कर्मचा:यांकडून एकमेकांना मोठय़ा आवाजात अपशब्दही वापरले जात होते. ज्याचा आवाज या परिसरातून जाताना सहज ऐकायला येत होता.
हा प्रकार अंत्यत गंभीर आहे. या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल. तसेच या खेळात महापालिकेचे कर्मचारी असतील, तर त्यांचे तत्काळ निलंबन केले जाईल. तसेच पोलीसही सहभागी असतील, तर त्यांच्या अधिका:यांकडून खुलासा मागविला जाईल. तसेच तो पोलीस आयुक्तांकडे पाठविला जाईल. या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल.
- राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त