ऐन पावसाळ्यात डोंबेवाडी तलाव कोरडाठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:39+5:302021-07-26T04:09:39+5:30
दुष्काळी काळातही शेतकऱ्यांना हा पाझर तलाव वरदान ठरत असतो. या तलावात पुरंदर जलसिंजन योजनेतून कायमस्वरूपी बंदिस्त पाईपलाईन योजनेद्वारे पाणी ...
दुष्काळी काळातही शेतकऱ्यांना हा पाझर तलाव वरदान ठरत असतो. या तलावात पुरंदर जलसिंजन योजनेतून कायमस्वरूपी बंदिस्त पाईपलाईन योजनेद्वारे पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली आहेत. त्यानुसार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी देखील या बाबत सकारात्मका दाखवत जलसंपदा विभागाला मंजुरीच्या संदर्भात सूचना देऊन ही फाईल मंत्रालयात मंजुरीसाठी गेली आहे. मात्र अजूनही याला मंजूरी मिळाली नाही.
खोर परिसरातील कित्येक हेक्टर क्षेत्र हे डोंबेवाडी तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या तलावाच्याया माध्यमातून या भागामधील अनेक विहिरींना या पाण्याचा फायदा हा होत असतो. या भागांमधील असलेली अंजीर शेती ही पूर्णतः या तलावाच्याया पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे या पाणी योजनेचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी येथील नागरिकांची आहे. पावसाचे प्रमाण या भागात कमी असल्याने अनेक ठिकाणी अजून खरिपाच्या पेरण्या खोळंबून पडल्या आहेत. पावसाच्या दडीमुळे खरीप पिकांचा हंगाम हा लांबणीवर पडला गेला असल्याने शेतकरी अजून ही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
२५ खोर
ऐन पावसाळ्याच्या दिवसात डोंबेवाडी पाझर तलाव हा कोरडाठाक पडल्याचे दिसत आहे. (छायाचित्र : रामदास डोंबे)