घरगुती वादातून महिलेने मुलासह पेटवून घेतले
By admin | Published: April 22, 2017 03:37 AM2017-04-22T03:37:30+5:302017-04-22T03:37:30+5:30
ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात राहणाऱ्या साधना राहुल लोंढे (वय - २१) या महिलेने घरगुती वादातून मुलासह स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना शुक्रवारी
पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात राहणाऱ्या साधना राहुल लोंढे (वय - २१) या महिलेने घरगुती वादातून मुलासह स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली.
यावेळी पत्नी व मुलाला वाचविण्यासाठी गेलेला राहुल देविदास लोंढे (वय - २६) हा भाजला आहे. उपचारदरम्यान मुलगा अथर्व राहुल लोंढे (वय - १० महिने) याचा मृत्यू झाला असून महिला अत्यावस्थ आहे.पती आणि पत्नी यांच्यात पैशावरून झालेल्या वादातून पत्नीने जाळून घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली़ याप्रकरणी कुटुंबातील एकाही व्यक्तीकडून अद्यापही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)