घरेलू कामगार कल्याण मंडळ सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:36+5:302020-12-25T04:10:36+5:30
पुणे: राज्यातील घरेलू कामगारांसाठी २०१५ मध्ये घोषणा केलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनरूज्जीवित करावे, अशी मागणी महाराष्ट्र असंघटित कामगार ...
पुणे: राज्यातील घरेलू कामगारांसाठी २०१५ मध्ये घोषणा केलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनरूज्जीवित करावे, अशी मागणी महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेने कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. याबाबत प्रयत्न सुरू आहेत व त्याला नक्की यश येईल, असे आश्वासन वळसे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
संघटनेचे अध्यक्ष शरद पंडित, तसेच मीना पंडित, सुवर्णा कोंढाळकर, राजकूमार सुतार, उषा जाधव यांच्या शिष्टमंडळात समावेश होता. राज्यात काही लाखांच्या संख्येने घरेलू कामगार आहेत. कोरोना काळात त्यांचे काम पुर्णपणे बंद होते. त्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. या कामगारांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहेच, शिवाय त्यांच्यासाठी विविध योजनाही राबवल्या गेल्या पाहिजेत. कल्याण मंडळ असेल तर हे शक्य आहे. सन २०१५ मध्ये सरकारने घोषणा केलेले हे मंडळ त्वरीत सुरू करावी असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.