मनाची श्रीमंती! डोळे, फुफूस, ह्दय, यकृत, किडनी केली दान; गरिब कुटुंबाचा समाजापुढे आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:20 PM2020-12-24T18:20:14+5:302020-12-24T18:26:16+5:30

संतोष धोंडिभाऊ बांगर (वय ४३) असे या दानशुर मजुराचे नाव आहे.

Donate eyes, lungs, heart, liver, kidneys; Respect for the poor family in front of the society | मनाची श्रीमंती! डोळे, फुफूस, ह्दय, यकृत, किडनी केली दान; गरिब कुटुंबाचा समाजापुढे आदर्श

मनाची श्रीमंती! डोळे, फुफूस, ह्दय, यकृत, किडनी केली दान; गरिब कुटुंबाचा समाजापुढे आदर्श

Next

आजच्या युगात माणुस पैशासाठी काही ही करायला तयार असतो. ऐवढेच काय आपले अवयव सुद्धा विकायला तयार असतो. मात्र, बेल्हा येथील एका कुटुंबाने मुलाच्या मृत्यूनंतर चक्क त्याचे अवयव दान करत समाजापुढे आदर्श निर्मण केला आहे. डोळे,  फुफूस, ह्दय,यकृत, किडनी गरजुंना दान करत या कुटुंबाने चार जनांना जिवदान देत अवयव दानाचे महत्व स्पष्ट केले आहे.

संतोष धोंडिभाऊ बांगर (वय ४३) असे या दानशुर मजुराचे नाव आहे. बेल्हा (ता.जुन्नर) येथील एका बांधकाम व्यवसायिकाकडे संतोष हा मजुर म्हणून काम करत होता. काम करत असतांना एका लाकडी परातीच्या फळीवरुन त्याचा पाय घसरला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील एका खाजगी रूग्ग्णालयात दाखल केले. परंतु दोनच दिवसात उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे छत्र हरवले.

संतोषला वडील नाहीत वृद्ध आई,पत्नी व एक ७ व्या इयत्तेत शिकत असलेला मुलगा आहे. फक्त ११ गुंठेच जमिन. त्यात एक लहान भाऊ सगळ काही मजुरीवरच चालायच. त्यात कमावता गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला अशाही परिस्थितीत स्वतःचे डोंगराएवढे दुःख बाजुला त्यांनी ठेवले. अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र या अशिक्षित मजुराच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी समाजाने पुढं यावं असं आवाहन जानकू डावखर,बबन औटी, विकास बढे यांनी केलं आहे.

संतोषच्या दशक्रिया विधीच्या वेळी ब्राम्हण, नाभिक समाज, प्रवचनकार, स्पिकरव्यवस्था या सर्वांनी निशुल्क सेवा देऊन स्वतः रोख मदतही दिली. मजुरांना काम करताना सुरक्षितता वाटेल तसेच मजुरांचा सामुहिक विमा परंतु या सर्व गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुटूंबातील एकमेव कमावता आधार गेल्यानंतर कुटूंब उघड्यावर पडते. दोन ते चार दिवस इतर लोक चुकचुकतात नंतर मात्र त्या कुटूंबाकडे दुर्लक्ष होते किंवा समाज विसरुन जातो.यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी मजुरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मत माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके यांनी व्यक्त केले.

Web Title: Donate eyes, lungs, heart, liver, kidneys; Respect for the poor family in front of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.