जिल्हा परिषदेच्या शाळेला संगणक-लॅपटॉप दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:22 AM2021-02-05T05:22:06+5:302021-02-05T05:22:06+5:30
पुणे : अमेरिकेची आयटी सोल्यूशन प्रदाता कंपनी ‘इमर्ज ३६०’ ने डोणजे ( ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला ४ ...
पुणे : अमेरिकेची आयटी सोल्यूशन प्रदाता कंपनी ‘इमर्ज ३६०’ ने डोणजे ( ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला ४ डेस्कटॉप आणि ६ लॅपटॉप दान केले आहेत.
याचा उपयोग शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत केला जाणार आहे. यामुळे मुले संगणक आणि डिजिटल जगाद्वारे जगाशी जोडली जाणार आहेत. यावर्षी दरमहा एका शाळेत १० डेस्कटॉप/लॅपटॉप देण्याचे नियोजन ‘इमर्ज ३६०’ने केले आहे.
कंपनीचे श्रीराम धोत्रे यांनी सांगितले की, ज्या शाळांना प्रत्येक वर्गातील मुलांसाठी संगणक आणि लॅपटॉपची व्यवस्था करता येत नाही अशाच शाळा आम्ही निवडत आहोत. आयटी आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आम्ही सामाजिक ऋण म्हणून या शाळेपासून संगणक लॅपटॉप देणगी मोहीम सुरू करण्याचा निर्णय आमच्या कंपनीने घेतला आहे.
जिल्हा परिषद शाळा डोणजेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी निफाडकर म्हणाल्या, “इमर्ज ३६० च्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. या संगणकीय देणगीमुळे मुलांना संगणक प्रयोगशाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळतील. ते इंटरनेट आणि संगणकाच्या जगाशी अधिक चांगले जोडले जातील.”
-फोटो ‘जेएमएडीट’ला मेल केला आहे.