दौैंडला पूर्ववैैमनस्यातून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:41 AM2018-05-05T03:41:02+5:302018-05-05T03:41:02+5:30
लिंगाळी (ता. दौंड) परिसरातील पासलकरवस्ती येथील विनोद नरवाल (वय ४१) यांच्यावर गुरुवारी (दि. ३) रात्री १० च्या सुमारास सशस्त्र हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली. पूर्ववैैमनस्यातून ही घटना घडली आहे.
दौंड - लिंगाळी (ता. दौंड) परिसरातील पासलकरवस्ती येथील विनोद नरवाल (वय ४१) यांच्यावर गुरुवारी (दि. ३) रात्री १० च्या सुमारास सशस्त्र हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली. पूर्ववैैमनस्यातून ही घटना घडली आहे.
याप्रकरणी संजित टाक (वय ३८), रवी टाक (वय २७, दोघेही रा. पासलकरवस्ती, लिंगाळी, दौंड), आकाश बहोत (वय २८,रा. वाल्मीकीनगर, दौंड) या तिघांना अटक केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी मीना नरवाल यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. याप्रकरणी २० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी १० वाजण्याच्या सुमारास पासलकरवस्ती परिसरात संजित टाक, सुजित टाक, रवी टाक, रणजित टाक, आकाश बहोत, आशिष बहोत, नरेश वाल्मीकी, बबलू सारवान, सुरेश सारवान, उषा घंटे, मयूरी टाक, माधुरी टाक, शोभा वाल्मीकी, विकी वाल्मीकी, सौरव वाल्मीकी यांच्यासह अन्य अज्ञात चार ते पाच लोकांनी आमची मोटारसायकल अडवली. हातातील तलवारीने आणि इतर लोकांनी लोखंडी पाइप, काठ्या घेऊन मारहाण केली. माझी आई मालन शिंदे सोडविण्यासाठी आली असता तिच्या गळ््यावर तलवार लावली आणि शिवीगाळ केली. झालेल्या मारहाणीत माझ्या पतीच्या दोन्ही हाताला, पायाला, डोक्याला आणि छातीला जखमा झाल्या. त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.