शुल्कासाठी तगादा लावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:12 AM2021-02-12T04:12:14+5:302021-02-12T04:12:14+5:30
तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी राज्य शासनाच्या "महाडीबीटी'' पोर्टलवरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख ...
तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी राज्य शासनाच्या "महाडीबीटी'' पोर्टलवरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजना , राज्य अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करतात. या शिष्यवृत्तीमुळे तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो.परंतु,
"महाडीबीटी'' पोर्टलवरून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या काही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे किंवा आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याने अद्याप विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. यात विद्यार्थ्यांचा कोणाही दोष नाही.या परिस्थितीत अनेक संस्थांकडून विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी परिपत्रक काढले आहे.तसेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करूनही शुल्क भरण्याच्या तगाद्याविषयी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त होणार नाही, त्यादृष्टीने संस्थांनी काळजी घ्यावी,अशा सूचनाही जाधव यांनी परिपत्रकाव्दारे दिल्या आहेत.