सावरकरांना भारतरत्न नकाे, ''हिंदुरत्न'' द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:02 IST2019-10-16T14:58:00+5:302019-10-16T15:02:51+5:30
सावरकरांना भारतरत्न ऐवजी हिंदुरत्न पुरस्कार देण्यात यावा असे वक्तव्य युक्रांतचे संस्थापक डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.

सावरकरांना भारतरत्न नकाे, ''हिंदुरत्न'' द्या
पुणे : भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत पाठपुरवठा करणार असल्याचे जाहीर केले. त्यावर बाेलताना युवक क्रांती दल (युक्रांत) चे संस्थापक डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी टीका केली असून सावरकर हे हिंदुत्ववादी हाेते. त्यांच्या स्वप्नातील हा भारत नाही. त्यांना हिंदुराष्ट्र हवे हाेते, त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्याऐवजी हिंदुरत्न द्या. त्याला आपचा विराेध नाही, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करु शकेल अशा उमेदवारांना युवक क्रांती दलाने पाठींबा जाहीर केला असून त्याबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
सप्तर्षी म्हणाले, सावरकर हे संविधान न मानणारे हाेते. आरएसएसमधील एक गट सावरकरांना मानणारा आहे. भाजपामध्ये अनेक बाहेरच्या लाेकांना घेण्यात आले आहे. त्यामुळे पक्षातील सावरकरवादी लाेकांना खुश करण्यासाठी भाजपाकडून सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मुळात सावरकरांच्या स्वप्नातील हा भारत नव्हता. ते हिंदुत्ववादी हाेते आणि त्यांना हिंदुराष्ट्र हवे हाेते. त्यामुळे त्यांना भारतरत्न ऐवजी हिंदुरत्न पुरस्कार दिल्यास आमची काही हरकत नाही परंतु त्यांना भारतरत्न नकाे.
दरम्यान 9 ऑक्टाेबर राेजी युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करु शकेल, अशा उमेदवाराला युक्रांत समर्थन देईल, असा ठराव मंजुर करण्यात आला आहे.