कोरोनाच्या लाटेचा विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:58+5:302021-08-01T04:09:58+5:30

बारामती : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा ...

Don't let the corona wave affect development work | कोरोनाच्या लाटेचा विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका

कोरोनाच्या लाटेचा विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका

Next

बारामती : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामतीमधील विकासकामांच्या पाहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शनिवारी (दि. ३१) कोरोना प्रादुर्भावाची स्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही दिल्या.

या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी कऱ्हा नदीसुधार प्रकल्प, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभीकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. या वेळी विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

---------------------------

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पूरग्रस्तांसाठी मदतीच्या साहित्याची वाहने रवाना करण्यात आली. बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनतर्फे ५० हजार रुपयांचे रेनकोट दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठवण्यात आले. सिद्धिविनायक तरुण मंडळ जाचक वस्ती, सणसर (ता. इंदापूर) यांच्यातर्फे ५० हजार रुपयांचे रेनकोट व भाजीपाला दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. सिल्वर ओक युवा प्रतिष्ठान सणसर (ता. इंदापूर) यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे २५० फूड पॅकेट दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

अविनाश लगड मित्र मंडळ बारामती यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे ७० फूड पॅकेट. बोर्गेवाडी व जुगाईवाडी तारळे विभाग (ता. पाटण) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. फेरोरा इंडिया मित्र परिवार, क्षेत्रीय ट्रेकर्स व क्रिकेट क्लब बारामती यांच्यातर्फे चिपळूण, महाड व रायगड पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे ३५० फूड पॅकेट पाठविण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुग्धविकास योजनेच्या माध्यमातून बारामती तालुका सहकारी दूध संघाला २६१ अडल्टरेशन किट व ७४ एएमसी युनिट मिळाले, त्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

बारामती येथील नीरा डावा कालव्याच्या सुरू असलेल्या कामाची पहाणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

३१०७२०२१-बारामती-०१

Web Title: Don't let the corona wave affect development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.