सामाजिक दानाचा गाजावाजा करु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:46+5:302021-03-09T04:13:46+5:30
दौंड: समाजात दान देणाऱ्यांचे हात सामाजिक बांधिलकीतून पुढे येत आहे. माञ दान देत असताना त्याचा गाजावाजा ...
दौंड: समाजात दान देणाऱ्यांचे हात सामाजिक बांधिलकीतून पुढे येत आहे. माञ दान देत असताना त्याचा गाजावाजा करु नका असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा माजी सनदी आधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील स्व. रोहिणी जाधव ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी देशमुख बोलत होते. पुरस्कार वितरणाचे हे २५ वे वर्ष आहे. रोहिणी जाधव संस्थेचे अध्यक्ष रविंद्र जाधव यांनी संस्थेच्य कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे, अशोक सस्ते, सचिन कुलथे, डॉ. प्रेमकुमार भट्टड, डॉ. राजेंद्र माने, ॲड. अशोक मुनोत उपस्थित होते.
इंद्रजित देशमुख म्हणाले, सामाजिक दान हे गुप्त स्वरुपात असावे. ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे अशा व्यक्ती पर्यंत दान पोहचले तर देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे सार्थक होते माञ निरर्थक ठिकाणी सामाजिक दान जाणार नाही याची खबरदारी दानकर्त्यांनी घेतली पाहिजे. समाजात दानाचे अनेक प्रकार आहे दरम्यान रक्तदान हे महत्वाजे दान आहे तेव्हा रक्तदान आणि निसर्ग पर्यावरण तसेच एडस जनजागृतीचे गेली पंचवीस वर्षा पासून पुरस्कार देणाऱ्या रोहीणी जाधव स्मारक ट्रस्टचे काम निश्चीतच समाजऊपयोगी आहे. सूञसंचालन विकास देशपांडे यांनी केले तर आभार डॉ प्रेमकुमार भट्टड यांनी मानले .
पुरस्कार्थींची नावे कंसात पुरस्काराचे नाव
नेचर काॅन्झर्वेशन सोसायटीच्या अध्यक्ष डॉ.हर्षद दिवेकर (निसर्ग पर्यावरण मिञ ), मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट ( एडस जनजागृती), गौतम लब्धी फाऊंडेशनो अध्यक्ष गौतम नाबरीया (रक्तमिञ), अमित गोखले, पनवेल, ( रक्तदाता)
०८ दौंड सामाजिक पुरस्कार
स्व. रैहीणी जाधव स्मारक ट्रस्टच्या वतीने सामाजिक पुरस्कार प्रसंगी पुरस्कार्थी व मान्यवर.