लॉकडाऊन नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:35+5:302021-04-03T04:09:35+5:30

मांजरी : कापड व्यापारी मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन नकोच कारण सामान्य ...

Don't miss the lockdown | लॉकडाऊन नकोच

लॉकडाऊन नकोच

Next

मांजरी : कापड व्यापारी

मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन नकोच कारण सामान्य माणसाचे जगणेच मुश्किल होऊन जाईल. आता कुठे सावरण्याचा आम्ही प्रयत्न करीत. विक्रीला अजूनही काही तेजी नाही. दुकानची भाडी, भरमसाठ लाईनबिल भरताभरता जीव मेटाकुटीला येत आहे. लॉकडाऊन हा एकमेव यावर उपाय नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर संसर्ग कमी होईल, १०० टक्के लसीकरण त्वरित व्हावे. - पांडुरंग घुले, कापड व्यापार

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे संपूर्ण महाविद्यालय बंद होती, आता कुठे अंशतः सुरू झाली. ऑनलाइन शिक्षण व्यवस्था सुरू झालेली आहे. मागील वर्षी झालेले शैक्षणिक नुकसान आता कुठे भरून निघेल, अशी आशा असतानाच लॉकडाऊनची पुन्हा चर्चा सुरू झाली की धास्ती वाटू लागते. त्यामुळे लॉकडाऊन नकोच. - सेजल मंगसुळीकर, कॉलेज विद्यार्थिनी

Web Title: Don't miss the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.