अनधिकृत बांधकाम नोंदीबाबत राजकारण करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:19+5:302021-07-12T04:08:19+5:30
नमुना ८ ला नोंदी झाल्या म्हणजे नागरिकांनी केलेलं अतिक्रमण कायम झाले असे नाही. याची कल्पना नागरिकांना देणे ...
नमुना ८ ला नोंदी झाल्या म्हणजे नागरिकांनी केलेलं अतिक्रमण कायम झाले असे नाही. याची कल्पना नागरिकांना देणे आवश्यक आहे व या नोंदी घेण्यासाठी कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याची आवश्यकता नाही. करवसुलीसाठी ग्रामपंचायत नमुना ८ ला नोंद झाल्यानंतर या नोंदी कायम करण्यासाठी स्वखर्चाने याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे भूषण काळे यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करून विनाकारण नोंदी लावून घेण्यासाठी स्टंटबाजी करून उपयोग होणार नाही. उलट नागरिकांच्या हिताचा विचार करून गावातील सर्व अतिक्रमणधारकांच्या ग्रामपंचायत दफ्तरी नोंदी होतील यासाठी सहकार्य करावे व झालेल्या नोंदी कायम करण्यासाठी प्रयत्न करावे आहे आवाहन काळे यांनी या
वेळी केले आहे.
आयुक्तांच्या परिपत्रकानुसार बांडेवाडी भागातील नोंदीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर पळसदेव ,काळेवाडी नं. १ चे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच संपूर्ण गावातील अतिक्रमणधारकांच्या नोंदी नुमाना ८ ला घेऊन गावाचे उत्पन्न वाढणार आहे. मात्र, यामधील केवळ निवासासाठी अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांचे अतिक्रमण कायम होणे आवश्यक आहे त्यासाठी न्यायालयीन लढा लढणार असल्याचे काळे यांनी सांगितले.