पुणे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:21+5:302021-04-18T04:09:21+5:30
पुणे स्टेशनवर गर्दी रोखण्यासाठी सध्या ३० एप्रिल २०२१ पर्यंत सामान्य लोकांना प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नाहीत. केवळ वृद्ध, दिव्यांगजन, ...
पुणे स्टेशनवर गर्दी रोखण्यासाठी सध्या ३० एप्रिल २०२१ पर्यंत सामान्य लोकांना प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नाहीत. केवळ वृद्ध, दिव्यांगजन, रुग्ण इत्यादी आवश्यक व्यक्तींना मदत करण्याच्या उद्देशाने प्लॅटफॉर्मची तिकिटे रू. ५० च्या दराने दिली जात आहेत. कन्फर्म व आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्याची आणि ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी आहे.
रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर येण्याची आणि ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे अशा प्रवाशांनी स्टेशनवर गर्दी करू नये.
सध्या धावणाऱ्या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असून त्यामध्ये सेकंड एसी, थ्री एसी, स्लीपर आणि द्वितीय आसन श्रेणीचे कोच आहेत.या विशेष गाड्यांमध्ये कोणतेही सामान्य, अनारक्षित कोच उपलब्ध नाहीत.
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोहोचावे. खूप अगोदर येऊ नये.
रेल्वेचे पीआरएस काउंटर किंवा आयआरसीटीसी वेबसाईटवरुन प्रवासी त्यांचे तिकीट बुक करू शकतात.
प्रवाशांना विनंती आहे की, कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करावे. विशेष गाड्यांविषयी सविस्तर माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वेकडून केले आहे.