कोट्यवधींचा खर्च नको, पर्यावरणीय प्रवाहासाठी स्वच्छ पाणी सोडा - सुशोभीकरणापेक्षा सांडपाणी स्वच्छ करायला हवे, श्रीकांत इंगळहळीकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:09+5:302021-05-04T04:04:09+5:30

पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांवर जलविद्युत प्रकल्प आहेत, त्यामुळे त्यातून किमान पाणी खडकवासला धरणात वाहते. खडकवासल्यातला सारा साठा मुख्यत: ...

Don't spend crores, leave clean water for environmental flow - Sewage should be cleaned instead of beautification, demands Srikant Ingalhalikar | कोट्यवधींचा खर्च नको, पर्यावरणीय प्रवाहासाठी स्वच्छ पाणी सोडा - सुशोभीकरणापेक्षा सांडपाणी स्वच्छ करायला हवे, श्रीकांत इंगळहळीकर यांची मागणी

कोट्यवधींचा खर्च नको, पर्यावरणीय प्रवाहासाठी स्वच्छ पाणी सोडा - सुशोभीकरणापेक्षा सांडपाणी स्वच्छ करायला हवे, श्रीकांत इंगळहळीकर यांची मागणी

Next

पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांवर जलविद्युत प्रकल्प आहेत, त्यामुळे त्यातून किमान पाणी खडकवासला धरणात वाहते. खडकवासल्यातला सारा साठा मुख्यत: पाईपमार्गे पुणे शहरासाठी आणि उरलेला कालव्यातून शेतीसाठी वापरला जातो. यातून मुठेला जीवित ठेवण्यासाठी बंधनकारक असलेल्या पर्यावरणीय प्रवाहासाठी एक थेंबही शिल्लक राहात नाही. मग मुठा नदीत प्रत्यक्ष काय वाहते आहे ? फक्त सांडपाणी.

----------------

पाण्याचा वापर १५० लिटर करावा

पुणे शहरासाठी १५०० एमएलडी (दशलक्ष लिटर्स दर दिवसाला) पाठवले जाते. पुण्याची लोकसंख्या ५० लाख धरली, तर ३०० लिटर दर माणशी दर दिवशी असा वापर होतो. लोकसंख्येनुसार हा वापर १५० लिटर असायला हवा. पुण्यालगतची अद्ययावत नांदेड सिटी आपली गरज केवळ ११० लिटरमध्ये भागवते. पुण्याचा वापर एवढा जास्त‌ का ? असे विचारल्यास (जुन्या गंजलेल्या पाईपमुळे) ४० टक्के तर गळतीच असते, असे सांगितले जाते. हे खरे मानले तर ६०० एमएलडी पाणी गळून विहिरी, भूजल किंवा मुठा नदी दुथडी भरून वाहताना दिसली असती. पाण्याचा वापर आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे १५० लिटर केला, तर ७५० एमएलडी पाणी वाचेल किंवा नदी जीवित करण्यासाठी ते मुठेत सोडता येईल.

-----------------

हे १५० लिटर पाणी सांडपाण्यात कसे बदलते ?

सध्याची (एसटीपी) शुध्दीकरण क्षमता याच्या निम्मीच आहे. म्हणजे ७५० एमएलडी सांडपाणी थेट नदीत जाते. उरलेले सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पांच्या ८०% कार्यक्षमतेमधून नदीत जाते. म्हणजे आणखी १५० एमएलडी सांडपाणी साफ न होताच नदीत जाते. नदीतल्या पाण्याची शुध्दता पाहायची असेल तर (डबल मास्क घालून) मुंढवा जॅकवेलने उचललेले पाणी साडेसतरा नळीपाशी कॅनालमध्ये पाहावे.

-------------

एक थेंबही स्वच्छ पाणी नाही येत

नदीत एक थेंबही ताजे स्वच्छ पाणी येत नसताना, ६०% थेट सांडपाणी नदीत वाहत असताना आणि ४० % साफ (?) केलेले सांडपाणी नदीत वाहत असताना सर्व धडपड सांडपाणी प्रकल्पांची क्षमता १०० टक्के करण्यासाठी नको का? जायका प्रकल्प रखडलेला, खडकवासल्यात खडखडाट होईपर्यंत अतिरिक्त वापर, जुन्या गळक्या पाईपलाईन तश्याच आणि तरीही काळ्या सांडपाण्यावर ३००० कोटीच्या सुशोभीकरणाची घाई? कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है असे इंगळहळीकर म्हणाले.

----------

Web Title: Don't spend crores, leave clean water for environmental flow - Sewage should be cleaned instead of beautification, demands Srikant Ingalhalikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.